शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचे अनुदान क्षेत्रीय बँकेत कशासाठी?

By admin | Updated: June 8, 2014 23:33 IST

शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध

सुरेश सवळे - चांदूरबाजारशासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशातच राष्ट्रीयीकृत बँका वगळून शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेत १२ कोटींचे अनुदान जमा करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न शेतकर्‍यांमार्फत उपस्थित केला जात आहे. ऐन पेरणीच्या मोसमात काही का होईना हेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान मिळणार म्हणून शेतकरी शाश्‍वत होता. मात्र, या रखडलेल्या अनुदानामुळे आता त्या शेतकर्‍यांना नाईलाजास्तव सावकाराचे दार ठोठवावे लागत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील गारपीट नुकसानग्रस्त २३ हजार ८४४ शेतकर्‍यांना  १२ कोटी ५१ लाख ४0 हजार ८0२ रूपयांच्या अनुदानाचे वाटप करायचे होते. त्यातील ४ कोटी ९५ लाख ४0 हजार ८0२ रूपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ७ कोटी ५६ लाख रूपयांच्या अनुदानाचे बीडीएस जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयाला २0 मे रोजी प्राप्त झाले. मात्र, त्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे हे बिल ३ जूनपर्यंत कोषागार कार्यालयातून पास झाले नाही. त्यानंतर ही रक्कम दोन वर्षांंपूर्वी तालुक्यात दाखल झालेल्या शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय बँकेत जमा करण्यात आली. आता ही रक्कम वटविण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रक्रियेमुळे अनुदान वाटपात विलंब होत आहे. चांदूरबाजार शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पाच ते सहा राष्ट्रीयीकृत बँका असताना १८ किलोमीटर अंतरावरील क्षेत्रीय बँकेत रक्कम जमा करून या बँकेमार्फत इतर बँकेत अनुदान वळविण्याचा महसूल प्रशासनाचा तुघलकी निर्णयसुध्दा बँक व शेतकरी वतरुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनुदानाची रक्कम अधिक काळ आपल्या बँकेत जमा राहावी, या स्वार्थी हेतूने या बँका मनुष्यबळाच्या अभावाची कारणे सांगून शेतकर्‍यांना व त्यांना मिळणार्‍या रकमेला वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. इतकेच नव्हे तर एक शाखाधिकारी व एक लिपिक अशा दोन कर्मचारी असलेल्या विदर्भ क्षेत्रीय बँकेकडून धनादेश ‘क्लिअरिंग’ तातडीने करण्याची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याऊलट तालुक्यातील ४0 हजार २३६ अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची २७ कोटी २७ लाख ९0 हजार २७४ रूपयांच्या नुकसानीच्या रकमेपोटी आतापर्यंत २१ कोटी ६६ लाख ५५ हजार ७८३ रूपये स्टेट बँकेमार्फत वाटप करण्यात आले. अजूनही २ हजार ४९७ शेतकर्‍यांना ५ कोटी इतकी रक्कम वितरित करणे बाकी आहे. असे असताना गारपिटीची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत का जमा करण्यात आली नाही? हा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.