शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

-तर हॉकर्सना व्यवसायबंदी!

By admin | Updated: May 7, 2016 00:38 IST

महापालिकेद्वारा सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास ठेंगा दाखविणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायच करता येणार नाही, ...

बायोमेट्रिकला ठेंगा : दस्तऐवज सादर करण्यासाठी २० मे ची 'डेडलाईन'प्रदीप भाकरे अमरावतीमहापालिकेद्वारा सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास ठेंगा दाखविणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायच करता येणार नाही, असा गंभीर इशाराच महापालिका यंत्रणेने दिला आहे. २० मेपर्यंत फेरीवाल्यांनी संबंधित झोन कार्यालयात दस्ताऐवज जमा करावेत, अन्यथा त्यांना महापालिका क्षेत्रात व्यवसायबंदी घातली जाईल, अशी जाहीर सूचना पालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्यावतीने प्रसृत करण्यात आली आहे. शहरातील वाढते अतिक्रमण, अनियंत्रित वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी हॉकर्स झोनचा पर्याय सशक्तपणे समोर आला. फेरीवाल्यांचे अतिक्रमण तर शहरवासीयांसाठी डोकेदुखी बनले आहे. या पार्श्वभूमिवर फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा पर्याय समोर आला. त्यानुसार मे.सिमॅक आय.टी. प्रा. लि. अमरावती, या संस्थेला शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कंत्राट देण्यात आले आहेत. १५ डिसेंबर २०१५ पासून या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. त्यानुसार ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व फेरीवाल्यांनी आपापले दस्तऐवज त्वरित जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला व्यापक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा १५ एप्रिलची 'डेडलाईन' देण्यात आली होती. महापालिकेची सूचना पायदळीशहरातील सर्व फेरीवाल्यांनी आपापले दस्तऐवज संबंधित झोन कार्यालयातील कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावेत. जे फेरीवाले १५ एप्रिलनंतर नियमानुसार दस्तऐवज जमा करणार नाहीत, त्या फेरीवाल्यांना त्यानंतर अवैध घोषित केले जाईल व त्यांना महापालिका क्षेत्रात व्यवसाय करता येणार नाही. तसेच यापुढे सर्वेक्षणास आणि दस्तऐवज जमा करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही शेकडो फेरीवाल्यांनी व्यवसायासंदर्भातील दस्तऐवज झोन कार्यालयात जमा केलेले नाहीत. कंत्राटदाराने बायोमेट्रिक सर्वेक्षण केले आहे. एकूण फेरीवाल्यांपैकी १७०० जणांनी आवश्यक दस्तऐवज जमा केले, तर अनेकांनी रहिवासी दाखलेच जोडलेले नाहीत. अशांना २० मे ची अंतिम मुदत दिली आहे. - राजेंद्र दिघडे, अधीक्षक, बाजार परवाना विभाग,मनपातारीख पे तारीखप्रथम ३१ मार्च, त्यानंतर १५ एप्रिल व आता पुन्हा नव्याने २० मे २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी २० मेपर्यंत न चुकता नियमानुसार दस्तऐवज जमा करावेत. ही अंतिम मुदतवाढ आहे. २० मेपर्यंत जे फेरीवाले आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांना यापुढे महापालिका क्षेत्रात व्यवसाय करता येणार नाही. ४०१९ फेरीवालेसिमॅक आय.टी. प्रा.लि. ने आतापर्यंत केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणामध्ये शहरात ४०१९ फेरीवाले व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी १७०० फेरीवाल्यांनीच आतापर्यंत आवश्यक ती कागदपत्रे झोन कार्यालयात जमा केली आहेत. अनेकांनी रहिवासी दाखला न दिल्याने त्यांच्यावर व्यवसायबंदीची तलवार कोसळू शकते.