शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी केले काय?

By admin | Updated: October 9, 2016 01:00 IST

पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी ...

परीक्षा पाटलांची : पदवीधरांचा सर्वत्र एकच सवालअमरावती : पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी पदवीधरांकडे तसेच सामान्यांकडे केलेले दुर्लक्ष ही त्यांच्यासमोरील प्रमुख अडचण ठरू लागल्याचे चित्र आजघडीला सर्वत्र आहे. सामान्यांमध्ये दांडग्या जनसंपर्काचा अभाव असलेले गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना पदवीधर मतदारसंघातून मिळालेला आमदारकीचा विजय ही खरे तर राजकीय भरारी घेण्याची सुवर्ण संधी होती. उच्चविद्याविभूषित असलेल्या पाटलांना या नामी संधीचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करता येणे सहज शक्य होते. तथापि वैद्यकीय व्यवसायात गुणवंत असलेले पाटील येथे कमी पडले. मुख्यमंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्यामुळे रणजित पाटील यांना कालांतराने गृह खात्याच्या शहरी विभागाचे राज्यमंत्रिपद आणि अकोल्याचे पालकमंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक जवळचे मंत्रिमंडळातील सहकारी, असा पाटील यांचा लौकिक झाला. मानही वाढला; परंतु या सन्मानासोबतच त्यांच्या शिरावरची जबाबदारी कैकपटीने वाढली. स्वप्रगतीचा आनंद खुद्द पाटलांना जितका होता तितकाच तो सामान्यजनांनाही होता. त्याला कारणही होते. पाटलांना बहाल झालेल्या अधिकारांमध्येही वाढ झाली होती. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, लोकांच्या भल्यासाठीचे मुद्दे शासनदबारी रेटण्यासाठी, बेराजगारांचे जीणे सुसह््य करण्यासाठी या अधिकारांचा वापर केला जाईल, या कल्पनेने त्याच्या अवतीभतवतीचे लोक हुरळले होते. त्यांच्या मतदारसंघातही याच कारणामुळे आनंदी-आनंद होता. सामान्यजनांना त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर उपाय हवे होते. बेरोजगारांना नोकऱ्या अन् पदवीधरांना आयुष्याचा निर्णायक ठावठिकाणा हवा होता; पण जुनाच अनुभव आला. लाभाच्या राजकारणात व्यग्रअमरावती : हुरळलेल्या लोकांना काहीच प्राप्त झाले नाही. आपले मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन समस्यांसाठी भांडतील, ही आशा मृगजळ ठरली. मुख्यमंत्र्यांचा जो लाभ पाटील यांना झाला तो सामान्यजनांपर्यंत, पदवीधरांपर्यंत पझरलाच नाही. रणजित पाटील हे लाभाच्या राजकीय डावात इतके गुंतले की, सामान्यांच्या अपेक्षांची ना त्यांनी कदर केली ना चिंता. सत्ता काहीही घडवून आणू शकते, या समिकरणावर जणू आंधळा विश्वास ठेवणाऱ्या पाटील यांनी सामान्यांच्या पदरी जी निराशा टाकली, त्यासंबंधिच्या चर्चांचे आता मोहोळ उठू लागले आहेत. आपल्या मतांवर रणजित पाटील मोठ्ठे झाले खरे; पण आपल्यासाठी त्यांनी काय केले, पदविधरांचा हा जागोजागी विचारला जाणारा सवाल बरेच काही सांगून जातो.सत्तेचा दुरुपयोगसत्तेची नशा कशी असते बघा! बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि सत्तेचा दुरुपयोग पाटील यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून वर्षभरापासून सुरू केला. युवक बेरोजगारांचे मेळावे, पदवीधर मतदारसंघाची सदस्य नोंदणी, पदवीधरांना प्रलोभने, शाळांमध्ये कार्यक्रम या बाबींसाठी पाटील यांनी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला. विरोधी पक्षांनी त्याबाबत आकांततांडव केलाच; परंतु समान्यांच्या मनातही पाटील यांच्या या वृत्तीची चीड निर्माण झाली. बी.टी.देशमुखांसारख्या द्रष्ट्या, अभ्यासू नेत्याच्या मतदारसंघातील मतदार तसा खुळा नाहीच. राजकारणासाठी सत्तेचा दुरुपयोग त्यामुळेच खपवून घेतला जाणारा मुद्दा नाही. दुसरीकडे स्पष्टवक्तेपणाच्या स्वभावात आमुलाग्र बदल घडवून संजय खोडके यांनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. दांडगा जनसंपर्क, सामान्यांची कामे करण्यासाठीची अव्याहत धडपड, पदवीधरांच्या समस्यानिवारणात सक्रिय सहभाग या सत्ता नसतानाही आवर्जून जपलेल्या बाबी लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला. 'बी.टी.' उभे राहणार असतील तर आजही मी माघार घेणार, हे खोडके यांचे जाहीर विधान त्यांच्या राजकीय परिपक्वतेची उंची वाढविणारे ठरले. पाटलांचा राजकीय नवखेपणे आणि खोडकेंचा राजकीय मुरब्बीपणा हादेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाटलांना बरेच होमवर्क करावे लागणार आहे.