संदीप मानकर दर्यापूरलोकमत विशेषआठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणात असलेल्या गरिबांच्या पाच झोपड्या नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या. गरिबांच्या या झोपड्यांवर नगरपालिकेने कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्यावर असलेल्या विळख्यात असलेल्या अतिक्रमणाचे काय, असा सवाल दर्यापूरकर विचारत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक बसस्थानक चौक, रेल्वे गेटजवळ, अकोला रोड, मेन रोड आधी परिसरात अवैध अतिक्रमणाने थैमान घातले आहे. संपूर्ण दर्यापूर नगरीच अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. परंतु नगरपालिका या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. दर्यापूर, अकोट रस्ता हा मुख्य महामार्ग आहे. हजारो वाहने येथून रोज ये-जा करतात. किरकोळ व फळविक्रेत्यांनी येथे आपली दुकाने थाटली आहे. काही लोकांनी तर येथे चक्क आॅटो दुरुस्तीचे गॅरेज थाटले आहे. भर रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे जळ वाहनांना त्रास होतो. आधीच तर रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर्यापूर शहराचे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा अनेक वेळा चर्चेला येतो. पण नेमकी माशी कुठे शिंकते हेत कळत नाही. मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडे यांनी यासंदर्भात अनेक वेळा बैठका घेतल्या. परंतु कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही. कधी नगरसेवकांचा विरोध अशा अनेक कारणांमुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नसल्याचे समजते. परंतु सुंदर शहर करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याच्या भावना आहेत.नवनिर्वाचित अध्यक्षांकडून अपेक्षानुकतीच दर्यापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या वंदना राजगुरे निवडून आल्या. सुंदर दर्यापूर शहर करण्यासाठी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले अतिक्रमण ते काढतील का? असा प्रश्न दर्यापुरातील नागरिक विचारत आहेत. वंदना राजगुरे यांच्यासमोर अतिक्रमण काढण्याचे आव्हान आहे व लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन व नगरपालिका यांनी बैठक घेऊन संयुक्तरित्या कारवाई करणे गरजेचे आहे. चुकीच्या गतिरोधकामुळे मणक्यांच्या आजारात वाढनुकत्याच दर्यापूर नगरपालिकेने पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले. परंतु संस्कृती कलेक्शन ते नगरपालिकापर्यंत करण्यात आलेल्या या रस्त्यांवर तब्बल सात ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. हे गतिरोधक उंच व चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचे मत अनेक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. येथून ये-जा करणाऱ्या लोकांना या गतिरोधकामुळे मणक्याच्या आजारात वाढ झाल्याचे अनेकांनी सांगितले.एवढे गतिरोधक टाकण्याचे काम नसल्याचे अनेकांनी सांगितले.
झोपड्या तोडल्या, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचे काय?
By admin | Updated: June 5, 2015 00:37 IST