शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मृत्यूपथ’ अंथरणारा हा कसला विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:48 IST

शहरवासीयांचा अंत पाहणाºया येथील शिवाजीनगर ते बडनेºयापर्यंतच्या 'हाय-प्रोफाईल' सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आधीच महिनाभरापासून वैतागलेल्या....

ठळक मुद्देपीडब्ल्यूडी दावणीला : कार्बन मोनॉक्साईडचे जीवघेणे उत्सर्जन, दोन महिन्यांपासून नागरिकांचा छळ

गणेश देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरवासीयांचा अंत पाहणाºया येथील शिवाजीनगर ते बडनेºयापर्यंतच्या 'हाय-प्रोफाईल' सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आधीच महिनाभरापासून वैतागलेल्या अमरावतीकरांना आता राजरोसपणे श्वसनाचे आजार प्रदान केले जात आहेत.मुंबईच्या जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीकडे या रस्त्याच्या निर्मितीचे कंत्राट आहे. कामाचे मूल्य ८३.५५ कोटी रुपये आहे. काम दर्जेदार आणि जलदगतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरण्यात येत आहे. अत्यंत वर्दळीचे रस्ते अडवून महिनोगिनती लांबविले जाणारे हे काम ढिसाळ नियोजनाचा ज्वलंत नमुना ठरले आहे.जीवघेणे प्रदूषण आणि कणाहीन अधिकारीसंबंधित कामावर मंगळवारी दिवसभर जनरेटर चालविण्यात आले. हे जनरेटर १०० मीटर परिघातील लोकांच्या कानठाळ्या बसाव्यात इतका कर्कष आवात करीत होते. अशा ध्वनीप्रदूषणासोबत अत्यंत गंंभीर पातळीचे वायुप्रदूषणही हे जनरेटर करीत होते. सोबतचे छायाचित्र बघून त्याबाबतची कल्पना येऊ शकेल. रंगहीन वा पांढºया रंगाचा वायू हा कार्बन मोनॉक्साईड असतो. आरोग्यासाठी धोकादायक मानल्या जाणाºया काळ्या रंगाच्या कार्बन डायआॅक्साडच्या तुलनेत हा वायू अधिक घातक आहे. हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जात होता. अभियंता असलेले-तगडे वेतन घेणारे; पण कणा नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना ही बाब जराही खटकली नाही. दोन महिन्यांपासून नागरिकांना धूलिकण सेवन करावे लागत आहेत, ते वेगळेच!जनरेटर उत्सर्जित वायूने ५०० लोकांचा मृत्यूअमेरिकेत कार्बन मोनॉक्साईडच्या विपरित प्रभावावर एक अभ्यास जाहीर करण्यात आला. त्यानुसार, घराबाहेर ठेवल्या जाणाºया लहान आकाराच्या जनरेटरमधून उत्सर्जित होणाºया या वायुमुळे सन २००५ पासून २०१३ पर्यंत ५०० लोकांचे मृत्यू झालेत. दरवर्षी २० हजारपेक्षा अधिक नागरिकांना इमर्जन्सी वैद्यकीय सेवा त्यामुळे घ्यावी लागते. ४००० पेक्षा अधिक लोकांना इस्पितळात दाखल व्हावे लागते. हा अभ्यास ज्या जनरेटर्सवर आधारित होता ते अमेरिकेतील होते. अर्थात ते अत्यंत कमी प्रमाणात विषारी वायू सोडणारे होते. हे जनरेटर भारतातील आहे. जुने आहे. विषारी वायू सोडण्यासाठीच निर्माण केले असावे, अशा ताकदीने वायू सोडणारे आहे. त्यामुळे मनुष्यआरोग्याची किती भयंकर हानी होत असावी?प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार काय कारवाई?वायूप्रदूषण रोखण्यासाठी राजधानी दिल्लीत रान उठले असताना अमरावतीत मुद्दामहून विषारी वायू वातावरणात सोडला जातो. येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तरीही शांतच असतात. पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत'ला राजरोसपणे खो दिला जात असतानाही प्रदूषणकर्त्यांवर कारवाई केली जाणार नाही काय?जनरेटर असावे असे आम्ही सुचविले होते; तथापि असे प्रदूषण केले जात असेल तर त्यासंबंधी दखल घेतली जाईल.- विवेक साळवे, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागविजेसाठी आम्ही भीक मागावी काय? अशा दर्जाचे काम यापूर्वी अमरावतीने बघितले तरी काय? बांधकाम विभाग विजेची सोय करून देत नाही.- राजेश लांबे, व्यवस्थापक, जेपीई.कार्बन मोनॉक्साईड हा वायू मानवी आरोग्यासाठी विषारी असतो. त्याच्या सततच्या सेवनाने श्वसनासंबंधीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.- डॉ.अतुल यादगिरे, अमरावती