शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

यशोमती ठाकुरांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:30 IST

आ. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मंगळवारी अमरावतीत प्रथमच आगमन झाले. येथील पंचवटी चौकात त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसजन एकवटले होते.

ठळक मुद्देकाँग्रेसजन एकवटले : ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मंगळवारी अमरावतीत प्रथमच आगमन झाले. येथील पंचवटी चौकात त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसजन एकवटले होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून सोडला. आ. ठाकुरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.आ. यशोमती ठाकूर यांचे मंगळवारी आगमन होणार असल्याची वार्ता जिल्ह्यासह महानगरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मिळाली होती. त्यांचे स्वागत वजा आगमनापूर्वी लागलेले होर्डिंग्ज, पोस्टर या मध्यमातूनदेखील ‘मॅसेज’ पोहचविण्यात आला होता.दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आगमन होताच काँग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली. आ. ठाकूर यांनी असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख आणि इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार्रापण केले. त्यानंतर वाहनांचा ताफा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिशेने निघाला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर शेळके, मनपा विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, अविनाश मार्डीकर, नगरसेवक प्रशांत डवरे, झेडपी सभापती जयंत देशमुख, श्याम देशमुख, नाना सोनी, आनंद भामोरे, बाबू खंडेलवाल, अशोक रेवस्कर, अभिनंदन पेंढारी, सुरेश रतावा, सागर देशमुख, राजा बांगळे, अनिकेत देशमुख, मुकदर खॉ पठाण, सुरेश स्वर्गे, नीलिमा काळे, वंदना कंगाले, शिवाजी किरक्टे, अलका देशमुख, वीरेंद्र जाधव, पुरुषोत्तम मुंदडा, हरिभाऊ मोहोड, प्रकाश साबळे, राहुल येवले, अर्चना सवाई, छाया दंडाळे, शोभा शिंदे, हफिजा युसूफ शाह, सुनीता भेले, मंजूषा महल्ले, हफिजाबी नूरखां, प्रदीप हिवसे, फिरोज खान, अ. वसीम मजीद, प्रफुल्ल राऊत आदी उपस्थित होते.जिल्हा काँग्रेसतर्फे सत्कारआ. यशोमती ठाकूर यांची देशाच्या काँग्रेस कमिटी आणि कर्नाटक राज्याच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनात त्यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बबलू देशमुख यांनी विदर्भातील एकमेव महिला आमदार यशोमती ठाकूर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांचे आभार मानले. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अमरावतीत पक्षाने एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्या रूपाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याची मान उंचावली असून, आ. ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, अर्चना सवाई, हरिभाऊ मोहोड, जि.प. सदस्य महेंद्रसिंग गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, श्रीपाल पाल, राहुल येवले, दयाराम काळे, प्रवीण घुईखेडकर, गणेश आरेकर, नगराध्यक्ष सिटू सुर्यवंशी, प्रदीप वाघ, भागवत खांडे, उषा उताणे, भागवत खांडे, शाम देशमुख, मनोज देशमुख, अलका देशमुख, सरिता मकेश्वर, वैभव वानखडे, मुकद्दरखाँ पठाण, गजानन राठोड, पंकज मेश्राम, प्रल्हाद ठाकरे, किशोर चांगोलेंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.