शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

हवामानावर आधारित पीक विमा योजनेत ‘मृगबहराचा’ समावेश

By admin | Updated: June 8, 2014 23:32 IST

खरीप हंगामात कमी पाऊस, पावसातील खंड व सापेक्ष आर्द्रता यापासून फळपिकांना निर्धारित कालावधीत संरक्षण मिळावे, हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांचे आर्थिक

पथदर्शक स्वरुपात लागू : संत्रा, मोसंबी, पेरुचा संरक्षित विमागजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगामात कमी पाऊस, पावसातील खंड व सापेक्ष आर्द्रता यापासून फळपिकांना निर्धारित कालावधीत संरक्षण मिळावे, हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे यासाठी हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना २0१४ सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात संत्रा, मोसंबी व पेरु या मृगबहर पिकांचा समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरु, आंबा व काजू या निवडक फळपिकांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचे प्रायोगिक तत्त्वावर हवामान घटकांपासून संरक्षण देण्यात आले होते. ही योजना राज्यामधील निवडक फळपिकांना त्यांच्या हंगामानुसार टप्प्याटप्प्याने लागू करण्यास शासनाने मंजुरात दिली आहे. योजना मंजूर असलेल्या तालुक्यात महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. या ठिकाणी नोंदलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार निर्देशित विमा कंपन्याद्वारा शेतकर्‍यांना बँकामार्फ त नुकसान भरपाई परस्पर देण्यात येणार आहे. अमरावती, वर्धा, बुलढाणा, नागपूर, हिंगोली व अहमदनगर जिल्ह्यातील संत्रापिकांच्या मृगबहरासाठी एचडीएफसी या विमा कंपनीद्वारा विमा संरक्षण देण्यात येणार आहे.विविध वित्तीय संस्था व बँका यांच्याकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या तसेच ज्या शेतकर्‍यांनी अधिसूचित फळपिकासाठी पीक कर्ज र्मयादा मंजूर आहे त्या शेतकर्‍यांना ही योजना सक्तीची आहे. गैर कर्जदार शेतकर्‍यांसाठी मात्र ही योजना ऐच्छिक स्वरुपात राहणार आहे.