तथागत गौतमबुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार : देशात, देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्षरोशन कडू तिवसाअवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दु:ख मुक्तीचा मार्ग शोधून संपूर्ण मानव जातीला दु:खमुक्त होण्यासाठी संदेश दिला, अशा तथागत बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेला आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जाणाऱ्या महावृक्षांचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा बोधीवृक्ष म्हणजेच पिंपळवृक्ष.या जुन्या व प्राचीन अशा पिंपळवृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून हा वृक्ष पर्यावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या विशाल वृक्षाचे पर्यावरणातून नामशेष होणे ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व बाधक ठरत आहे. पिंपळ हे वृक्ष जवळपास प्रत्येक गावात सर्रासपणे पाहायला मिळत असायचा. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेचे पिंपळ व वटवृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. मात्र त्या पुन्हा ती झाडे लावण्यात आली नाहीत. हा वृक्ष विहिरींमध्ये तसेच विहिरींच्या काठावर मोठ्या प्रमाणात दिसायचे. पण या झाडावरील पक्षांची विष्ठा विहिरीत पडते म्हणून अनेकांनी हे पिंपळ तोडले आहेत. पूर्वी पिंपळ वृक्ष सर्रासपणे दिसायचे, आता मात्र तो मंदिर व स्मशानभूमीच्या आवारात पहावयास मिळतो. मोकळ्या जागेत पिंपळवृक्ष लावल्यास पर्यावरणासाठी निश्चितच फायदा होईल. पिंपळ हा खास करून हळद्या, पोपट, मैना आदी पक्षांचा आवडता वृक्ष आहे. देशात आणि देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्ष पिंपळवृक्ष मूळचा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील असून हिंदीमध्ये पिपल, इंग्रजीत होली ट्री तर शास्त्रीय भाषेत फायकस रेलिजीओसा नावाने ओळखला जातो. हा वृक्ष मोरेसी कुळातील असून सर्वाधिक आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. भारत आणि भारताबाहेरही हा वृक्ष पूजनीय मानला जातो. पिंपळवृक्ष हा आयुर्वेद शास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या वृक्षाची मुळे व फांद्या डायबेटीस (मधुमेह) या आजारांवर गुणकारी आहेत. याशिवाय पिंपळवृक्षाच्या पाला शेळा, मेंढ्या आवडीने खातात. वाटसरूंना निवांत बसता यावे म्हणून या वृक्षांच्या बाजूने पार बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासूनची आहे.आरोग्यासाठी गुणकारी वृक्षपर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील हा वृक्ष खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड घेऊन शुद्ध प्राणवायू (आॅक्सिजन) देण्याचे महत्त्वाचे काम हा वृक्ष करतो.आरोग्याच्या दृष्टीने हृदयविकाराचे आजार, त्वचारोग आदी आजारांवर देखील हा वृक्ष गुणकारी आहे. पिंपळवृक्ष पानगळ होणाऱ्या वृक्षांमध्ये मोडतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला याची सर्व पाने गळून जातात. बोधीवृक्षाला म्हणजे पिंपळवृक्षाला ‘अश्वत’ म्हणूनही ओळखले जाते. अश्वत म्हणजे कधीही नाश न पावणारा किंवा कधीही नष्ट न होणारा पण आता मात्र पिंपळवृक्षाची कमी होणारी संख्या ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब होऊ लागली आहे. पिंपळवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणून या वृक्षाला ज्ञानवृक्ष मानले जाते.
‘बोधीवृक्ष’ नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: May 22, 2016 00:07 IST