शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांसमोरही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:13 IST

उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत.

नदी-नाले आटले : पाण्याची पातळीही घसरली, वन्यप्राणी मध्यप्रदेशकडे स्थलांतरितलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. प्रत्येक नदीपात्रात केवळ पाण्याचे अस्तित्व असल्याचे पांढरे निशाण दगडांवर पहावयास मिळत आहे. मोठ्या मुश्किलीने एखाद्या डोहात काही लीटर पाणी दिसल्यास ते फक्त सौभाग्यच म्हणावे लागेल.मेळघाटात तापी, गडगा, सिपना, खापरा, खंडू, दवाल यासारखे मोठे नदी असून हजारोंच्या संख्येने नाले आहेत. परंतु मे महिन्याच्या शेवटचा पंधरवाडा सुरू असताना जवळपास बहुतांश नदी-नाले पूर्णपणे आटल्याचे चित्र आहे. नदी-नाल्यातील पात्र आटल्याने वन्यप्राण्यांसमोर भीषण जलसंकट उभे ठाकले आहे. आपली तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. गावाकाठातील नदीपात्रात सुकसुकाट असल्याने पाळीव प्राण्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे. वन्यप्राण्यांची अवस्था तर आणखी बिकट झालेली आहे. एकीकडे पाण्याची तीव्रता सुरू असताना दुसरीकडे जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे त्यांच्या वास्तव्यालाच धोका निर्माण झाला आहे. सध्या जंगलातील वृक्षवल्ली पाने विरहीत झाले असल्याने सावलीचाही प्रश्न वन्यप्राण्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मेळघाटातील वाघ, बिबट, रानगवा, अस्वल, जंगली डुकरे यांचेसह हरिण, सांभर, मोर व माकडांसारख्या वन्यप्राण्यांना उन्हाळा काढणे दुष्कर ठरत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाकडून तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी नसल्याने वन्यप्राणी जंगलाकाठच्या तापी नदी पाण्याच्या शोधात उतरून मध्यप्रदेशाकडे स्थांनांतरित करीत आहे. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वन्यप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.