शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पश्चिम विदर्भातील १६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:46 IST

सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला.

- गजानन मोहोड

अमरावती : सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील १६३ गावांमधील भूजलात १ ते ३ मीटरपर्यंत तूट आल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) च्या ४,८३२ निरीक्षण विहिरींच्या नोंदीद्वारे नोंदविले गेले. या गावांमध्ये यंदा पाणीटंचाई राहणार आहे. याविषयीचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे पावसाळ्यानंतर विभागातील नियमित निरीक्षणाच्या  ६५३ विहिरी व नव्याने स्थापित केलेल्या ४१६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणीपातळीच्या नोंदींचा पावसाच्या नोंदीशी तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर  हा निष्कर्ष पुढे आला. विभागात सहा तालुक्यांत सरासरीच्या ३० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झालेला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावांमध्ये भूजलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटले. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात १४ गावे, घाटंजी तालुक्यात १४ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, तर राळेगाव तालुक्यात ९ गावंमधील भूजलात घट झाल्याने यंदा पाणीटंचाईचे सावट राहणार असल्याचा ‘जीएसडीए’चा नित्कर्ष आहे. पश्चिम विदर्भात एकूण ५६ पैकी ५२ तालुक्यांत अद्यापही पुरेसे भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४५६ गावांमध्ये भूजल १ मीटरपर्यंत घटले. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमधील ३०० गावे, यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांतील ६३५ गावे, बुलडाणा जिल्ह्यात १० तालुक्यांतील १५० गावे व वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ९४ गावांत अद्यापही भूजलात १ मीटरपर्यंत तूट आलेली असल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे.बॉक्सटंचाई राहणारे तालुके, गावांची भूजल स्थितीजिल्हा        तालुका    २ ते ३ मी    १ ते २ मी    एकूणअमरावती    भातकुली    १६    २३    ३९यवतमाळ    घाटंजी    ०७    ४०    ४७यवतमाळ    कळंब    ००    ०६    ०६यवतमाळ    केळापूर    ०२    ४६    ४८यवतमाळ    राळेगाव    ००    ०९    ०९यवतमाळ    यवतमाळ    ०१    १३    १४एकूण        ०६    २६    १३७    १६३

बॉक्सभूजलाचा उपसा अन् टंचाईची कारणे पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पिकासाठी तसेच बहुवार्षिक पिकांसाठी भूजलाचा झालेला अमर्याद उपसा, विंधन विहिरीद्वारे अतिखोल जलधारांतून होत असलेला भूजलाचा उपसा, सिंचनासाठी वापरण्यात येत असलेली पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदी कारणांमुळे भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत या तालुक्यांमध्ये २० ते ३० मिमी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसंकट ओढवणार आहे.