शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:06 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत.

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा : राज्याचे जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईलअमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत. गोरगरिबांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देणारे हे अभियान आहे. समाजात या कामामुळे विश्वास निर्माण होत असून महाराष्ट्रात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जल पुनर्भरणाचे काम अधिक गतीने केल्यास पुढील काळात राज्यातील जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईल, असा विश्वास मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रोहयो व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव प्रवीण दराडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाचे सचिव नाईक यांच्यासह जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी विभागातील जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित उपस्थित होते.जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, जलयुक्त शिवाराची कामे हे स्वेच्छेने आणि मनापासून करत आहोत, असे समजावे. राज्यात जे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनापासून करतील ते अधिकारी राज्यातील ‘युनिक आॅफिसर’ बनतील. जलयुक्त शिवार हा कार्यक्रम नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. या कामात पारदर्शकता आहे. हे काम पवित्र असून यात झोकून देऊन काम करणाऱ्यांना कधीच पश्चा:ताप होत नाही. या कामासाठी मला कधीही बोलवा मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचा आदर आहे. त्यांनी सर्वोच्च प्राथमिकता याला दिली आहे. जलयुक्त शिवारच्या कामांना भेटीजलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अधीक्षक कृषी अधिकारी मुळे उपस्थित होते. सावर्डी येथील पाझर तलाव आणि डवरगाव येथील तलावातील काढलेल्या गाळाची पाहणी केली. जलयुक्त शिवारमध्ये १३९६ गावांची निवडविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी अमरावती विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-२०१६ या वषार्साठी १३९६ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. आतापर्यंत २६८८२ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ५२४ गावात लोकसहभागातून २२३४ कामे सुरु आहेत. या कामाद्वारे ७५२४५८७ घन मीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढलेल्या रुंदीकरण, खोलिकरण कामांची लांबी ३४४ कि.मी. आहे.