शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची आघाडी; रोहयो माघारली

By admin | Updated: December 23, 2015 00:20 IST

देशासाठी वरदान ठरलेली महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यान्वित रोजगार हमी योजना हल्ली जलयुक्त शिवार योजनेमुळे माघारली आहे.

निधीचा तुटवडा : १२ पैकी एकाच विभागात रोजगार हमी योजनेची कामे सुरूगणेश वासनिक अमरावतीदेशासाठी वरदान ठरलेली महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यान्वित रोजगार हमी योजना हल्ली जलयुक्त शिवार योजनेमुळे माघारली आहे. रोहयोत निधीचा अभाव असल्याने प्रशासकीय यंत्रणादेखील या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या फक्त वन विभागात रोहयोची कामे सुरू आहेत. गावांचा विकास आणि स्थानिकांच्या हाताला काम, हे उद्दिष्ट ठेवून राज्यात १९७५ साली रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर या योजनेची व्याप्ती, उद्दिष्ट बघून केंद्र शासनाने रोजगार हमी योजना सन २००५ मध्ये सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रोजगार हमी योजना गाव-खेड्यात आजतागायत राबविली जात आहे. मात्र, राज्यात युती शासन आरुढ होताच रोहयोकडे दुर्लक्ष करून दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मागील वर्षापासून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना जमिनीतील जलपातळी वाढविण्यासाठी निश्चितच फलदायी ठरणारी आहे. परंतु रोजगार हमी योजना १२ विभागात सुरू असताना वनविभाग वगळता अन्य ११ विभागांनी रोहयोची कामे बंद केली आहेत. या योजनेतून ९० दिवस रोजगाराची हमी तर मजुराला प्रतिदिन २६७ रुपये रोजंदारी मिळत होती. अचानक रोहयोची कामे मंदावल्याने ग्रामीण भागातील मजुराला रोजगारासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे युती शासनाने जलयुक्त शिवार योजना मोठा गाजावाजा करून सुरू केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वत:ला झोकत असल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीचा पाऊस तर रोहयोसाठी ठणठणाट, असे विदारक चित्र आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रोहयोला गुंडाळण्याची शासनाची तयारी तर नाही नाा, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे. रोहयोला निधी मिळत नसल्याने ही योजना कशी राबवावी, हा प्रश्न पडला आहे. वनविभागात रोहयो अंतर्गत कामे केल्यानंतरही २ ते ३ महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्याने मजुरांना वेतन अदा करण्यासाठी संबंधितांना धावपळ करावी लागत आहे. मध्यंतरी रोहयोच्या मजुरीतील अपहार, कामातील अनियमितता टाळण्यासाठी या योजनेचे कामकाज आॅनलाईन करण्यात आले. मजुरांचे ई-मस्टर, बँकेत वेतन जमा करणे आदी कामकाजात पारदर्शकता आणली गेली. परिणामी ही योजना प्रभावीपणे राबविताना रोहयोसाठी निधी मिळत नसल्याने अचानक संबंधित यंत्रणेनेदेखील हात आखुडता घेतला आहे. हल्ली जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असल्याने कोणता जिल्हा जलयुक्त शिवार योजनेत अव्वल राहील, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. सामाजिक वनिकरण विभागाने सन २०१३ मध्ये रोहयोची कामे बंद केली आहेत.