शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चायना चाकू विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स’ वेबसाईटवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

प्रदीप भाकरे अमरावती : शहरात अलीकडे खुनाची नकोशी हॅटट्रीक नोंदविली गेली. खुनाच्या तीनही घटनांमध्ये चायना चाकू वापरण्यात आला. ते ...

प्रदीप भाकरे

अमरावती : शहरात अलीकडे खुनाची नकोशी हॅटट्रीक नोंदविली गेली. खुनाच्या तीनही घटनांमध्ये चायना चाकू वापरण्यात आला. ते धारदार चाकू ‘ऑनलाईन’ मागविले जातात हे स्पष्ट होताच, पोलीस आयुक्तांनी अशा कंपन्यांवर कटाक्ष रोखला आहे. चायना चाकूची ऑनलाईन विक्री व वितरणाला पायबंद घालण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या नावे सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार आदेश पारित केले आहेत. तो आदेश संबंधित कंपन्या व ई-कॉमर्स’ वेबसाईटला ई-मेल केला जाणार आहे.

खून वा खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये चायना चाकूचा सर्रास वापर केला जात आहे. चायना चाकू हा ‘डोमेस्टिक अप्लायंसेेस’ अर्थात घरगुती वापराचे साहित्य या वर्गवारीत मोडतो. त्यामुळे पोलीस तो चाकू जप्त करूनही शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवू शकत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन कुणाला संपविण्यासाठी चायना चाकूचा वापर बिनदिक्कतपणे केला जात आहे. अगदी काही अल्पवयीन मुलेदेखील दहशत निर्माण करण्यासाठी चायना चाकू बाळगत असल्याचे धक्कादायक निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. मोतीनगर, धाबा व महादेवखोरी येथे दिवसाआड झालेल्या हत्यांमध्ये चायना चाकूनेच सपासप वार करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या कमालीच्या गंभीर झाल्या आहेत. १७ ते २५ या वयोगटातील विशिष्ट तरुण चक्क चाकूचा डीपी ठेवून स्वत:चा शिक्का जमविण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळल्याो धक्कादायक वास्तव अलीकडच्या घटनांमुळे उघड झाले आहे.

३०० ते ५०० रुपयांमध्ये तीन दिवसात ‘डिलिव्हरी’

वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या काही कंपन्यांचे ॲप डाऊनलोड करून, त्यावर वस्तूंची ऑनलाईन खरेदी करता येते. तीन ते चार दिवसांमध्ये दिलेल्या पत्त्यावर संबंधित कंपनीचे डिलिव्हरी बॉय’ त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवून देतात. २९९, ३८९, ५४४, ६४९, ४९९, ११०० रुपयांपर्यंत हे चायना चाकू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

काय आहे आदेशात?

९ इंचापेक्षा अधिक लांबी असलेल्या चायना वा अन्य चाकूची विक्री करू नये, जे चाकू ९ इंचापेक्षा कमी लांबीच्या आहे, ते चाकू आतापर्यंत कुणी मागविले, त्यांचे नाव, पत्ता व संपूर्ण लेखाजोखा अमरावती शहर पोलिसांना न चुकता व विनाविलंब पाठवावा, असे आदेश सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार चायना चाकूची ऑनलाईन विक्री करणाऱ्या विशिष्ट कंपन्यांना देण्यात आले आहेत.

कोट

चायना चाकू विक्री व वितरणाला ब्रेक लावण्यासाठी सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार आदेश काढले. ते आदेश संबंधित कंपन्यांना ई-मेलने पाठविले जातील.

- डॉ.आरती सिंह,

पोलीस आयुक्त