शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग नियंत्रणासाठी १२५ वैद्यकीय पथकांचा ‘वॉच‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती व साथरोगावर नियंत्रणसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला ...

अमरावती : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती व साथरोगावर नियंत्रणसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर, १२५ वैद्यकीय मदत पथके सज्ज ठेवण्यात आली असून, जिल्हा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.

नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती उपायोजना संदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत असते. एक जूनपासून जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ तासात नियंत्रण कक्षाची स्थापना केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक वैद्यकीय मदत पथक याप्रमाणे ५९ ठेवण्यात आली आहे. याशिवाय मेळघाटातील धारणी तालुक्यात ७ पीएचसी व १० उपकेंद्राच्या अखत्यारितील २० गावे, तसेच चिखलदरा तालुक्यातील ५ पीएचसी ७ उपकेंद्र व अखत्यारितील नदीकाठच्या १५ गावात तसेच जिल्हास, तालुका वैद्यकीय अधिकारी १५ पथके तयार केली आहेत. सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी इमर्जन्सी औषध कीट तयार ठेवण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहतील. नियंत्रण कक्षातील कर्मचारी गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी शुद्धीकरण दैनंदिन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून होत आहे की, नाही याची खातरजमा करण्यात यावी, ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध आहे का, याची खात्री करावी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. सर्व गावात वाड्या वस्तीच्या ठिकाणी साथरोग जनजागृती अभियान, हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच सर्व खातेप्रमुखांना क्लोरीन स्टेटर देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाणी उद्भवतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी शुद्धीकरणाबाबत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचा ठिकाणी पाहणी करून पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. संपर्क तुटणाऱ्या गावात स्वयंसेवकाच्या व संस्था निश्चित करण्यात येऊन त्यांच्याद्वारे प्राथमिक उपचारासाठी औषधी उपलब्ध करून प्राथमिक औषधोपचाराची सोय करणे सूचना अधिनस्त यंत्रणेला दिल्या आहेत.

कोट

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काय उपाययोजना करावयाच्या याबाबत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीतून सूचना केल्या आहेत. त्यांचा प्रत्येक आरोग्य केंद्रात कार्यवाही सुरू आहे.

डॉ. मनीषा सूर्यवंशी,

जिल्हा साथरोग अधिकारी, अमरावती