शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बडनेर्‍यात आठवड्यापासून लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: June 7, 2014 23:39 IST

पाण्याचा प्रत्येक थेंब लाख मोलाचा असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने (मजीप्रा) केला जाणार्‍या पाणीपुरवठय़ादरम्यान शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

अमरावती : पाण्याचा प्रत्येक थेंब लाख मोलाचा असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने (मजीप्रा) केला जाणार्‍या पाणीपुरवठय़ादरम्यान शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ही यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते. बडनेर्‍यात गत आठवड्यापासून जलवाहिनी लिकेज असल्याने आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.पावसाळा येऊन ठेपला असताना अजूनही पाणी टंचाईची समस्या कायम आहे. ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. एवढेच नव्हे , यापूर्वी बडनेरा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र लोकप्रतिनिधी व जनतेच्या रेट्यामुळे मजीप्राला एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागे घेत आता बडनेर्‍यात उपलब्ध व्यवस्थेनुसार दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग उद्भवला आहे. हल्ली बडनेरा शहरात एकाच जलकुंभावरून जुनीवस्ती आणि नवी वस्ती या भागात पाणीपुरवठा करावा लागत आहे. हे करीत असताना मजीप्राची कसरतदेखील होत आहे. मात्र बडनेर्‍यातील नवी वस्ती परिसरातील राजेश्‍वर युनियन हायस्कूलच्या पाठीमागे  असलेल्या जलकुंभालगत अगदी हाकेल्या अंतरावर असलेले जलवाहिनीचे लिकेज कर्मचार्‍यांना दिसू नये, ही आश्‍चर्याची बाब समजली जात आहे.  जलकुंभ असलेल्या या ठिकाणी मजीप्राचे कार्यालय असून येथे कर्मचारी वर्गसुध्दा कार्यरत आहे. काही दिवसांपासून जलवाहिनी लिकेज असल्याने आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या परिसरातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचार्‍यांचा सतत वावर असतानासुध्दा हे लिकेज बंद करण्यात आले नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणचा कारभार  कसा सुरू आहे, हे निदर्शनास येते. गत आठवड्यात आ. रवी राणा यांनी पाणी टंचाईसदृश उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता बडनेर्‍यात टँकरने पाणी वाटप केले, हे विशेष. बडनेर्‍यातील नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.