शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागासाठी भांडारगृहाचा प्रस्ताव

By admin | Updated: March 23, 2016 00:26 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाकरिता नवीन भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव वित्त समितीत मंगळवारी पारित करण्यात आला.

विषय समितीची सभा : जिल्हा परिषदेत एकमताने ठराव पारितअमरावती : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाकरिता नवीन भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव वित्त समितीत मंगळवारी पारित करण्यात आला. वित्त विभागामार्फत शासनाकीय योजना, विकासकामे, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन आदी सर्व आर्थिक व्यवहार केले जातात. त्यासाठीचे प्रशासकीय कामकाजाचे सर्व रेकॉर्ड ठेवावे लागतात. यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे दस्ताऐवज ठेवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वित्त विभागासाठी स्वतंत्र भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार हा ठराव पारित करण्यात आला आहे. वित्त सभापती सतीश हाडोळे यांच्या दालनात २२ मार्च रोजी पार पडलेल्या सभेत या वित्त विभागासाठी भांडारगृह बांधण्याकरिता शिक्षण विभागाच्या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेतला आहे. याशिवाय सभेत कृषी विभागाच्या इमारतीची दुरूस्ती करण्यासाठी बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी पडत असल्याचा मुद्दा सदस्य मंदा गवई यांनी मांडला. यावर वित्त सभापती यांनी ही तरतूद आवश्यकतेनुसार वाढवून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे सन २०१६-१७ चे बजेट जिल्हा परिषद वित्त विभागाने तयार केले.मात्र याची तयारी करताना वित्त विषय समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन बजेट तयार करण्यात आला नसल्याचा आरोप समिती सदस्य मंदा गवई आणि जया बुंदिले यांनी केला. दरम्यान वित्त विभागाने याबाबत समिती सदस्यांना विविध विभागाचा अखर्चित निधी व अन्य विषयाची माहिती सभेत वाचून दाखविण्यात आली असल्याचा निर्वाळा सतीश हाडोळे, मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी स्पष्ट केले. सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा वित्त सभापती सतीश हाडोळे, समिती सदस्य जया बुंदीले, पुष्पा सावरकर, सुधाकर उईके, बाळकृष्ण सोळंके मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, अशोक तिनखेडे, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, उपअभियंता संजय येवले डीएचओ सुरेश आसोले व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आरोग्य समितीचाही आढावाजिल्हा परिषद आरोग्यविषयक समितीचा आढावा घेण्यासाठी २२ मार्च रोजी सभापती सतीश हाडोळे यांच्या दालनात समितीची सभा विविध विषयाला अनुरून बोलविण्यात आली होती. यावेळी सभेत सदस्य जया बुंदिले यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि भंडारज येथील उपकेंद्र येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर डीएचओ सुरेश आसोले यांनी सदर ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र संबंधित अधिकारी मागील तीन महिन्यांपासून रूजू झालेले नाहीत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे ती दूर करण्याचे आश्वासन दिले. सभेला पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.