मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर संविधानातील अनुछेद २४३ जीप्रमाणे आता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत प्रभाग समिती नियुक्त करून तालुक्यातील सर्वच गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्येक गावाच्या अडीअडचणींचे ग्राम स्तरावरच सोडवणूक व्हावी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग समिती नियुक्त केली आहे. या समितीत ग्रामीण पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता, जलसंधारण, ग्रामपंचायत, आरोग्य महिला व बाल कल्याण पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण अल्पबचत दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.अशी राहणार प्रभाग समितीप्रभाग समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य राहतील. यात पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पशूपर्यवेक्षक, शाखा अभियंता, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका, विस्तार अधिकाºयांचा समावेश असेल. दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात समितीची सभा त्या प्रभागात होणार आहे.समितीला हे राहतील अधिकारगावखेड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अद्ययावत करणे, पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन गळती दुरुस्ती करणे, पाणी शुद्धीकरणाचा वापर, वैयक्तिक शौचालय, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प आराखडा तयार करणे, पाणीपट्टी विशेष घरपट्टी वसुली आढावा दर चार वर्षांनी कर आकारणीचा प्रस्ताव, अतिक्रमण हटविणे, लोकवर्गणी गोळा करणे, ग्रामपंचायत भवन इमारत उभारण्याचे नियोजन करणे, ग्राम अभियान जन्म-मृत्यूची नोंद, प्राथमिक शिक्षण कुटुंबकल्याण, पाणी नमुने तपासणी, मलेरिया, क्षयरोग प्रतिबंधक तपासणी, अंगणवाडी मुलांना नियमित आहाराबाबत तपासणी, गावात स्वच्छता, साक्षरता अभियान, गुरांचे शिबिर, गुरांची खावटी योजना, गावातील सर्व कुटुंबांना योजनांत सहभागी करणे, अल्पबचत उद्दिष्ट, बीपीएलधारक कुटुंबांचे सर्वेक्षण अशा विविध योजना आराखडा ही समिती तयार करणार आहे.तालुक्यातील चारही जि.प. सर्कलमध्ये प्रभाग समिती नियुक्त आहे. महिन्याच्या दुसºया आठवड्यात समितीची बैठक होईल. यात सर्व अधिकाºयांची उपस्थित अनिवार्य आहे. यातून गावविकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.- माया वानखडे, बीडीओ, पं.स.
झेडपी सर्कलमध्ये आता प्रभाग समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST
राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्येक गावाच्या अडीअडचणींचे ग्राम स्तरावरच सोडवणूक व्हावी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग समिती नियुक्त केली आहे.
झेडपी सर्कलमध्ये आता प्रभाग समिती
ठळक मुद्देसर्व गावांचा आराखडा होणार तयार : अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासाची ठरणार दिशा