शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

होस्टेल प्रवेशासाठी ‘एसएमएस’ची प्रतीक्षा

By admin | Updated: July 29, 2016 00:21 IST

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश ‘एसएमएस’ची प्रतीक्षा आहे.

आॅनलाईन प्रक्रियेला उशीर : निवड यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष अमरावती : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश ‘एसएमएस’ची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये सुरू झाले असताना वसतिगृहात प्रवेश मिळाले नसल्याचे वास्तव आहे. शासनाने उशिरा आॅनलाईन प्रक्रिया राबविल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनुसूचित जाती संवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. याकरिता मुले, मुलींचे स्वतंत्र वसतिगृहे शासनाने निर्माण केली आहेत. वसतिगृहात प्रवेशासाठी यावर्षी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही प्रक्रिया उशिरा राबविण्यात आल्यामुळे अद्यापही अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, हे खरे आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात शालेय, इयत्ता १० नंतर अभ्यासक्रम, पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशांचे प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. शालेय व इयत्ता १० नंतरच्या विद्यार्थ्यांना ३१ जुलै तर पदवीधर, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना २० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करण्याची संधी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना ३ ते १५ आॅगस्टपर्यंत अर्ज सादर करावे लागतील. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतीच निवड यादी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांची निवड यादी ७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची निवड यादी ८ आॅगस्ट रोजी तर पदवीधर अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांची निवड यादी १० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पहिली निवड यादी २२ आॅगस्ट रोजी जाहीर केली जाईल. जिल्ह्यात समाज कल्याणची एकूण २४ वसतिगृहे असून २८६५ विद्यार्थी क्षमता आहे. (प्रतिनिधी) ‘‘ वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन प्रक्रिया असल्यामुळे त्यापूर्वी प्रवेशाची यादी प्रसिद्ध करता येत नाही. अर्ज सादर करण्याचा कालावधी ३१ जुलैपर्यंत आहे. लॉगिंग आटोपल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. ‘एससी’ संवर्गातील विविध प्रवर्गांना प्राधान्य दिले जाईल. - प्राजक्ता इंगळे, सहायक आयुक, समाजकल्याण