शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरी स्वराज्य संस्थांना निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 15, 2016 00:16 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ८२४ रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचा शासनादेश काढण्यात आला.

४३ कोटींना मान्यता : पाठपुराव्याची गरज अमरावती : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ८२४ रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचा शासनादेश काढण्यात आला. मात्र, २० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा निधी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात जमा झालेला नाही. यंत्रणेसह पदाधिकाऱ्यांनाही या को्यवधी रुपयांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अपवाद वगळता बुहतांश महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीना हा निधी अद्यापही प्राप्त झालेला नही. जिल्ह्यातील ४३ कोटीच्यानिधीच्या प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना महापालिकेसह ४३ कोटींचा निधी वितरित करण्यास २४ आॅगस्टच्या शासनदेशाद्वारे मान्यता देण्यात आली. हा निधी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालकांकडे सुपूर्द करण्यात आला. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने ही रक्कम संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिशाची रक्कम एनईएफटी किंवा ईसीएचद्वारे वितरित करण्याच्या सूचना होत्या. मात्र १८-२० दिवस उलटून गेल्यानंतरही हा निधी खात्यात जमा झोला नाही. विशेष महापालिकांसह बहुतांश नगरपालिकांमध्ये डिसेंबर १६ ते मार्च १७ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेवर आहे. याशिवाय राजकीय पदाधिकाऱ्यांकडूनही निधीचा विनियोग करण्याचे दबावतंत्र अवलंबविले जात आहे. निवडणुकीपूर्वी विकासकामे करुन मतदारांसमोर जाण्याचा पदाधिकारी-नगरसेवकांचा मानस आहे. संस्थानिहाय निधी अमरावती महापालिका २५.१९ कोटी, अचलपूर न.प. ४.३१ कोटी, अंजनगाव सुर्जी २.१० कोटी, वरुड न.प. २.१५ कोटी, मोर्शी न.प. १.५८ कोटी, दर्यापूर न.प. १.३८ कोटी, चांदूररेल्वे न.प. ७५.५२ लाख, चांदूर बाजार न.प. ७१.१० लाख, धामणगाव न.प. ८१.०९ लाख, शेंदूरजना १.०३ कोटी, चिखलदरा न.प. २३.७९ लाख, तिवसा नगरपंचायत १.३१ कोटी, धारणी नगरपंचायत ६८.५९ लाख, भातकुली नगरपंचायत ६७.१७ लाख, नांदगाव खंडेश्वर ९२.१२ लाख. ८२४ कोटींचा निधी आहरित करुन वितरित करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचार झाल्याचे आयुक्त तथा संचालक आणि सहायक संचालकांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षाकरिताच हा निधी खर्च करायचा आहे. मात्र अपवाद वगळता हा निधी अद्यापपर्यंतही संबंधित नागरी स्वराज्य संस्थांकडे पोहोचला नाही. महानगरपालिकेला १२.५९ कोटी प्राप्त १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अमरावती महापालिकेसाठी २५.१९ कोटी रुपये वितरित करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. या २५.१९ कोटी रुपयांमधून महानगरपालिकेला १२.५० कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. १२२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मनपाचा हिस्सा म्हणून हा निधी मजीप्राकडे हस्तांतरित करण्यात येणर आहे. उर्वरित रकमेची महापालिका प्रशासनाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.