शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पणनच्या केंद्रांना कापसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:41 IST

जिल्ह्यात २५ आॅक्टोबरपासून पणन महासंघाची पाच केंदे्र सुरू करण्यात आली; मात्र उद्घाटनापासून कापसाचा टिपूसही आलेला नाही.

ठळक मुद्देशेतकºयांची पाठ : खुल्या बाजारात अधिक भाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २५ आॅक्टोबरपासून पणन महासंघाची पाच केंदे्र सुरू करण्यात आली; मात्र उद्घाटनापासून कापसाचा टिपूसही आलेला नाही. खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.यंदा अमरावती, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी ही केंद्रे बुधवारपासून सुरू झाली. मात्र, या केंद्रांवर आतापर्यंतची खरेदी निरंक आहे. यंदाच्या हंगामात सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. पणनला स्वतंत्रपणे कापूस खरेदीची परवानगी शासनाने नाकारली. मात्र, सीसीआयची अभिकर्ता म्हणूून कापूस खरेदीची परवानगी दिली. याविषयीचा करारनामादेखील मंगळवारी झाला. बुधवारपासून पणन महासंघाने जिल्ह्यातील चार केंद्रांवर कापूस खरेदीचा शुभारंभ केला; मात्र शेतकरी खुल्या बाजारात अधिकचा भाव मिळत असल्याने तिकडे वळला आहे. त्यामुळे शासनाला शेतकºयांना संरक्षण द्यायचे झाल्यास आधारभूत किमतीमध्ये उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा द्यावा लागेल तसेच गुजरातच्या धर्तीवर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस द्यावा लागेल, अन्यथा शेतकºयांचा कापूस खरेदी करून व्यापारी तो गुजरातमध्ये विकतील.मागील वर्षीदेखील व्यापाºयांनी हाच फंडा वापरून जिल्ह्यातून खरेदी करून बहुतांश कापूस गुजरातमध्ये विकला होता. यंदा पाऊस नसल्याने कपाशीची पेरणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे वेचणीलादेखील वेळ लागत आहे आदी कारण देत पणनच्या केंद्रांकडून कापसाची प्रतीक्षा केली जात आहे. पणनने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे बहुतांश कापूस उत्पादक विक्रीसाठी खासगी केंद्राकडेच वळत आहेत. पणन अथवा बाजार समितीत शेतकºयांना कापूस विक्री करताना आधार नोंदणी अनिवार्य केल्यामुळे या भानगडीतून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतला.कापूस खरेदीसाठी आॅनलाईनची भानगडपणन केंद्रांवर कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकºयांना बाजार समितीमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकºयांना सातबारा, बँक खातेक्रमांकासह आधार क्रमांकही द्यावा लागणार आहे. केंद्रांवर मिळणारा कमी भाव, आॅनलाइन नोंदणी आणि दोन आठवड्यांनी मिळणारे पेमेंट याचा परिणाम केंद्रांवरील कापूस विक्रीवर होणार आहे.असा आहे कापसाचा हमीभावयंदाच्या हंगामात कापसाच्या वाणानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. बन्नी- ब्रम्ह या जातीला ४ हजार २२०, एच ४, एच ६ ला ४ हजार २२० एलआरए- ५१६६ या जातीला ४ हजार १२० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. उत्पादनखर्च वाढला असल्याने हमीभावात शेतकºयांना नुकसानच सहन करावे लागत आहे.गुजरातमध्ये बोनस; राज्यात केव्हा ?गुजरात राज्याने कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील कापूस गुजरातमध्ये जात आहे. अशीच स्थिती राहिल्यास राज्यातील कापूस व कापड उद्योगांवर संक्रांत येईल. त्यामुळे राज्यात गेल्या तीन वर्षांपासून आश्वासनांवर झुलणाºया कापूस उत्पादकांना बोनस द्यावा, अशी मागणी आहे.