शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

बीपीएल यादीची लाभार्थ्यांना प्रतीक्षा

By admin | Updated: June 17, 2014 23:56 IST

महापालिकेतील दारिद्रय रेषेखालील(बीपीएल)च्या यादीची लाभार्थ्यांना अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आहे. बीपीएल यादीत नावे समाविष्ट नसल्याने या योजनापासून वंचित आहेत. यापूर्वीच्या यादीत धनदांडग्यांची नावे

लाभापासून वंचित: पुर्वीच्या यादीत श्रीमंतांची नावेअमरावती: महापालिकेतील दारिद्रय रेषेखालील(बीपीएल)च्या यादीची लाभार्थ्यांना अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आहे. बीपीएल यादीत नावे समाविष्ट नसल्याने या योजनापासून वंचित आहेत. यापूर्वीच्या यादीत धनदांडग्यांची नावे असल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.सन-२००५ मध्ये बीपीएल यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांचे राहणीमान, उत्पन्न, घराचा दर्जा, शिक्षण आदी बाबी लक्षात घेत हे सर्वेक्षण पार पडले. बीपीएल यादीत असलेल्या अटी व नियम पूर्ण करणाऱ्या २६ हजार व्यक्तींची यादी तयार करून ती शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आली . मात्र ८ वर्षांचा कालावधी लोटला असताना बीपीएलची यादी मंजूर होऊन परत आली नाही. परिणामी या ८ वर्षांच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनापासून वंचित राहावे लागले आहे. बीपीएलच्या यादीत नावे नसल्याने घरकुलाच्या योजनापासून वंचित राहावे लागले. बीपीएलची यादी केंव्हा येणार? याबाबतच्या चौकशीसाठी लाभार्थी महापालिकेच्या पायऱ्या झिजवीत आहेत. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतंर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी बीपीएल क्रमांक आवश्यक असल्याने अनेक लाभार्थी बीपीएलच्या यादीची प्रतीक्षा करीत आहेत. २६ हजार संख्येपैकी किमान २० हजारापेक्षा जास्त बीपीएलची यादी मंजूर होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. येत्या २४ जून रोजी बीपीएलच्या यादीविषयी मुंबईत बैठक होत असल्याची माहिती आहे.मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिब कुटुंबांची नावे बिपीएल यादीत नसल्यामुळे खरे लाभार्थी यापासून वंचित आहे. बिपीएल यादीत नावे असलेली काही नावे ही मोठ्या कुटुंबातील असल्यामुळे बिपीएलच्या यादीत खऱ्या लाभार्थ्यांचा समावेश व्हावा यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पात्र लाभार्थ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)