मोर्शी : काँग्रेस आणि विदर्भ जनसंग्रामच्या नगर सेवकातील फुटीचा लाभ विदर्भ जनसंग्रामच्या महादेवराव वाघमारे यांना मिळाल्यामुळे ते नप उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले. विरोधकांनी या निवडणूकीत उमेदवार उभा केला नाही. स्थानिक नगर परिषदेचे अध्यक्षपद सतत चौथ्यांदा महिलांकरीता आरक्षीत असल्या प्रकरणी येथील राकाँ नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे यांनी महिला आरक्षणा विरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात मिळालेल्या स्थगनादेशामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली नाही. दर्यापूर पालिकेत काँग्रेसचे उपाध्यक्षस्थानिक नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे शादत खाँ पठाण यांची निवड करण्यात आली. शादत खाँ पठाण पाचव्यांदा उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर स्वीकृत सदस्य म्हणून नगरसुधार समितीचे मो. खलीली मो. अमजद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अंजनगावच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या हनिफा बी काँग्रेसच्या अकरा नगरसेवकांसह शिवसेनेच्या तारा सरकटे व शीला गिरी आणि अपक्ष शंकर मालठाणे या नगरसेवकांनी अध्यक्षपदाकरिता काँग्रेसच्या हनिफाबी मो. शरीफ यांना मतदान करून इतिहास घडविला. शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी येवूल यांना सेनेचे सात, बंडखोर काँग्रेसचे तीन व भाजपाचा एक अशी अकरा मते मिळालीत. संपूर्ण बहुमताने मुस्लीम नगराध्यक्ष निवडून येण्याची अंजनगाव न. प. मधील ही पहिलीच घटना आहे. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे देवीदास नेमाडे चौदा मतांनी विजयी झाले. त्यांनी बंडखोर काँग्रेसचे विनीत डोंगरदिवे यांचा पराभव केला. चांदूररेल्वे पालिकेवर काँग्रेस आघाडीचा झेंडा नगरपरिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी काँग्रेसच्या अंजली सुनील अग्रवाल तर उपाध्यक्षपदी राकाँच्या श्रृतिका अनिल आठवले या निवडून आल्या. मागील अडीच वर्षाच्या भाजपाची सत्ता पुन्हा काँग्रेस राकाँने खेचून आणून चांदूररेल्वे नगरपरिषदेवर काँग्रेस-राकाँने बहुमत सिद्ध केले.नगरपरिषदेत भाजप-सेना ८, काँग्रेस ७, राकाँ १, चांदूर वि आघाडी १ असे पक्षीय बलाबल होते. आज झालेल्या निवडणुकीत भाजपात बंडखोरी होऊन भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. अध्यक्षपदाकरिता काँग्रेसच्या अंजली सुनील अग्रवाल, भाजपातर्फे सचिन जयस्वाल रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अध्यक्षपदाचे मतदानाचे वेळेस तटस्थ राहिले. वरूडमध्ये विदर्भ जनसंग्रामचा बोलबाला नगरपरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी जनसंग्रामचे रवींद्र थोरात तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे लिलाधर बेलसरे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे होते. तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष तसेच आरोग्य सभापती लिलाधर बेलसरे यांच्या नावाला उपाध्यक्षपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर नगरसेवकांनी पाठींबा दर्शविला. त्यामुळे लिलाधर बेलसरे उपाध्यक्षपदी अविरोध घोषित करण्यात आले. प्रहारची पकडनगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत प्रहार या सत्तारुढ गटाने आपली परंपरा व पकड कायम राखली असून प्रहारच्या शुभांगी प्रशांत देशमुख यांची नगराध्यक्षपदी तर मुजफ्फर हुसैन रहेमतुल्ला यांची उपाध्यक्षपदी निर्विरोध निवड जाहीर करण्यात आली. ही निवड पीठासीन अधिकारी शरद जावळे (तहसीलदार) यांनी घोषित केली. शेंदुरजनाघाटच्या नगराध्यक्षपदी सरिता खेरडेनगरपालीकेच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी विदर्भजनसंग्रामच्या सरीता खेरडे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे देवानंद जोगेकर निवडूून आले. १७ सदस्य संख्या असणाऱ्या शेंदुरजनाघाट नगर पालिकेत विदर्भ जनसंग्रामचा वरचष्मा आहे. विदर्भ जनसंग्राम ८, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस चार व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. आज पीठासीन अधिकारी राम लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी विदर्भजनसंग्रामतर्फे सरीता अरुण खेरडे, राष्ट्रवादीच्या निलीमा निळकंठ वऱ्होकर व काँग्रेसच्या कल्पना सुभाष खंडारे यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता.परंतु १९ जुलैला काँग्रेसच्या कल्पना खंडारे यानी नामांकन अर्ज मागे घेतल्याने जनसंग्रामच्या सरीता खेरडे व राष्ट्रवादीच्या निलीमा वऱ्होकर यांच्यात थेट लढत झाली. यात सरीता खेरडे यांचा विजय झाला.अचलपूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी मो. गणीअचलपूर नगरपालीकेच्या आज मंगळवारी झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मो. गणी शेख रुस्तम यांची निवड झाली. तर अविरोध निवड झालेले नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांनी आपल्या पदाचा पदभार सांभाळला. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची अविरोध निवड झाल्यानंतर नगराध्यक्षपदी रंगलाल नंदवंशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मोर्शीत उपाध्यक्षपदी वाघमारे
By admin | Updated: July 22, 2014 23:48 IST