शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मतदान आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:06 IST

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था अमरावती मतदारसंघातून सदस्य निवडीसाठी सोमवार, २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात थेट लढत असून, ४८९ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

ठळक मुद्दे४८९ मतदार निवडणार आमदार : पोटे-माधोगडीया यांच्या राजकीय भवितव्याचा होणार फैसला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था अमरावती मतदारसंघातून सदस्य निवडीसाठी सोमवार, २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात थेट लढत असून, ४८९ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. कायदा व सुवव्यस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. अमरावती व भातकुली या दोन तहसीलमध्ये मतदान होणार आहे. ग्रामीण भागात १२ तहसील केंद्रांवर मतदान केंद्रे राहतील. प्रत्येक केंद्रावर पाच असे एकूण ७० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केले आहे. ही निवडणूक थेट पोटे आणि माधोगडीया यांच्यात होत आहे. गत १५ दिवसांपासून कोणताही गाजावाजा न करता भाजप आणि काँग्रेसने छुप्या पद्धतीने प्रचार केल्याचे दिसून आले. थेट मतदारांशी संवाद, भेटीगाठी हेच सूत्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. अगदी मतदानाच्या शेवटच्या दोन दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीनंतर घोडेबाजार जोरात होईल, असे राजकीय जाणकाराचे मत आहे. या निवडणुकीत महापालिकेतून ८७ नगरसेवक, जिल्हा परिषदचे ७२ सदस्य, नगरपालिका व नगरपरिषदेचे सदस्य असे एकूण ४८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील तहसीलमध्ये मतदारांना सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे.२४ मे रोजी होणार मतमोजणी२१ मे रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतमोजणी गुरूवार, २४ मे रोजी सकाळी ८ वाजता पासून येथील जिल्हा नियोजन भवनात सुरू केली जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जांभळ्या रंगाच्या मार्कर पेनने मतदानविधानपरिषद निवडणुकीत मतदारांना पसंती क्रमांकानुसार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्याकरिता निवडणूक आयोगामार्फत पुरविल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाचा मार्कर पेनचा वापर अनिवार्य आहे. मतदारांना केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाईल, टॅब, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक सयंत्र घेऊन जाण्यास प्रतिबंध असून या बाबींचे उल्लंघन केल्यास १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील व मुद्देमाल जप्त करण्यात येईल.