शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या, मतदान केंद्रच निश्चित नाही!

By admin | Updated: May 27, 2014 18:43 IST

शिक्षक मतदार संघ निवडणूक : नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनत्र दाखल करण्यासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अद्याप मतदार यादी आणि मतदान केंद्रच निश्चित नाही. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करताना सूचकांचे नाव व मतदार क्रमांक देताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. त्यासाठी मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचना जारी केली असली तरी मंगळवारी सायंकाळपर्यंत अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्‘ातील मतदारांच्या याद्याच अंतिम झालेल्या नव्हत्या. मतदार याद्या अंतिम नसल्याने अद्याप मतदान केंद्रही निश्चित होऊ शकले नाही. मतदार याद्या आणि मतदान केंद्रच तयार नसल्याने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. जुन्या यादीनुसार उमेदवारांनी अर्जावर सूचकांचे नाव टाकल्यास ते नवीन यादीनुसार चुकीचे ठरून अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)**  काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणाच नाही!शिक्षक मतदार संघात काँग्रेसने कोणत्याही संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता यावेळी थेट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणाच झाली नाही. अकोला जिल्‘ातील माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे पुत्र प्रकाश तायडे यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणाच न झाल्याने काँग्रेसच्या शिक्षक सेलचे सदस्य संभ्रमात पडले आहेत.