शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कुं कू’ वाचविण्यासाठी विमलबार्इंची धडपड

By admin | Updated: June 28, 2014 00:23 IST

पतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन वार्धक्यात आयुष्याच्या सोबत्याची संगत हिरावते की काय, ही भीती त्यांना वाटू लागली. पण...

गणेश वासनिक अमरावतीपतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन वार्धक्यात आयुष्याच्या सोबत्याची संगत हिरावते की काय, ही भीती त्यांना वाटू लागली. पण, त्यांनी पराभव पत्करला नाही. त्या लढल्या. सतत तीन वर्षांचे परिश्रम आणि औषधोपचारामुळे त्यांचे पती कर्करोगातून सावरले असले तरी पुढील उपचारासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथील रहिवासी प्रभाकर दत्तुबाजी बाहे (७५) यांना वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. घरी दोन एकर शेती. तरीही मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. कर्करोग म्हणजे साक्षात मृत्यू. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कोठून करणार?, अशा एक ना अनेक समस्या प्रभाकर दत्तुबाजी बाहे यांच्या अर्धांगिनी विमलाबार्इंना सतावत होत्या. तरीदेखील पतीचा कॅन्सर बरा व्हावा, मृत्यूच्या कराल दाढेतून त्यांना बाहेर काढावे, यासाठी त्यांनी धडपड सुरु केली. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात प्रभाकर बाहे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना अन्यत्र नेण्याचे सांगण्यात आले. अशा वेळी काय करावे, हा पेच विमलाबार्इंना पडला. परंतु काहीही झाले तरी ‘कुंकू’ वाचवायचेच अशी खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. अखेर राजीव गांधी आरोग्य सेवादायी योजनेंतर्गत येथील विदर्भ सेवासंदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे प्रभाकरराव बाहे यांच्यावर उपचार सुरु झाले. प्रारंभी तीन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या कानाखाली सुपारीच्या आकाराची असलेली गाठ किमोथेरेपीदरम्यान आपोआप नष्ट झाली. गाठ नष्ट झाल्याने विमलबार्इंना मोठा दिलासा मिळाला. मात्र, कर्करोग पूर्णपणे बरा झाला नव्हता. आतापर्यत प्रभाकरावांवर सहा किमोथेरपी करण्यात आल्या आहेत. उपचारासाठी बाहे दाम्प्त्याला कॅन्सर तज्ज्ञ राजेंद्रसिंग अरोरा यांचे सहकार्य लाभत आहे. विमलबाई या न चुकता प्रभाकररावांना केमोथेरेपीसाठी (तपासणी) सतत घेऊन येत असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची चमूदेखील अवाक् झाली. विमलाबार्इंचा हा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. पतीला कॅन्सरमुक्त करण्याची त्यांची धडपड अविरत सुरूच आहे.