शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू गाळणारा सहा महिन्यांकरिता स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:12 IST

नांदगाव खंडेश्वर : हातभट्टीची दारू गाळून विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलून तालुक्यातील येवती येथील आरोपी नरेंद्र संगीतराव सोनबावणे (३५) ...

नांदगाव खंडेश्वर : हातभट्टीची दारू गाळून विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलून तालुक्यातील येवती येथील आरोपी नरेंद्र संगीतराव सोनबावणे (३५) याला सहा महिन्यांसाठी अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही जिल्ह्यातील पहिली कारवाई ठरली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, सदर इसमावर यापूर्वी हातभट्टीची दारू तयार करणे, अवैध दारूची वाहतूक व विक्री प्रकरणात विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. पण, त्याच्यावर या कारवाईचा काहीही परिणाम झाला नसल्याने याला आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या इसमाला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी केल्यानंतर व सदर इसम सराईत हातभट्टीवाला असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला सहा महिन्यांसाठी अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश ५ मे रोजी पारित केला.

नांदगाव पोलिसांनी या इसमाचा शोध घेऊन अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, प्रवीण अंबाडकर तसेच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, चंद्रकांत कोष्टी, प्रशांत बेलोकर, राजेश इरपाते यांनी ही कारवाई केली.