शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:37 IST

विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्देठाणाठुणीत ज्यूस प्रकल्प। मोर्शी तालुक्यातील संत्रा उन्नती प्रकल्पामुळे उत्पादकांना ‘अच्छे दिन’

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.ठाणाठुनी येथे १०० एकरापेक्षा अधिक जमिनीवर जैन इरिगेशन, कोकाकोला व शासन भागीदार असलेला संत्रा उन्नती प्रकल्प नव्याने उदयास येत असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. संत्रा प्रकल्प हा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी उन्नतीची पर्वणीच ठरणार आहे. विदर्भातील संत्र्याला आता प्रक्रियेची साथ लाभणार आहे. तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात आली आहे.राज्यात दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड होते. त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरूड, मोर्शी परिसरात आहे. त्यामुळेच या भागाला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’देखील म्हटले जाते. याआधी मोर्शी, वरूड तालुक्यात संत्रा ज्यूस प्रकल्पाची उभारणी शक्य झाली नाही. स्थानिकांच्या दबावामुळे कृषी औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून मायवाडी (जि. अमरावती) व काटोल (जि. नागपूर) येथे संत्रा ग्रेडिंग आणि साठवण प्रकल्प उभे झाले. परंतु, त्याचा संत्रा उत्पादकांना काही एक फायदा झाला नाही.अशी आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्येशेतकऱ्यांकडून ‘सी’ ग्रेड संत्री व चुरा विकत घेतील. त्याला निश्चित दर मिळेल. लेमन ज्यूस तयार होणार; त्यामुळे प्रकल्प सात महिने चालणार. बेडवरील सघन लागवडीकरिता एकरी ३३३ रोपांची गरज. ठिबक सिंचनाचा खर्च राहील. लागवडीनंतर तीन वर्षांत फळधारणा. या कालावधीत हळद किंवा आल्याचे आंतरपीक घेता येते. २० हजार हेक्टर अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांत लागवडीचे उद्दिष्ट आहे. १०४ एकरांवर साकारणार प्रकल्प. ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प एका वर्षात पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.शेतकऱ्यांना सुविधाब्राझील येथीलच पाच वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाणार आहेत. प्रात्यक्षिक प्लॉट राहतील. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोयदेखील या ठिकाणी आहे. हायटेक आॅडिओ व्हिडीओ बसचा संत्रा उन्नती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी व संत्राबागांना भेटी देण्यासाठी उपयोग होणार असून, त्याद्वारे शेतकºयांना दर्जेदार शेती प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत.