शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी गाडीमालकांनी मोजले तब्बल 77 कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:03 IST

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत.

प्रदीप भाकरे/ अमरावती :  वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत. त्यातील १७ जणांनी तर अडीच लाख रुपये किंमत असलेले क्रमांक ७१ लाखांना मिळविले. २३.४५ कोटी रुपये महसूल मिळवून पुणे विभाग यामध्ये अव्वल ठरला आहे.

वाहनधारकांच्या विशिष्ट क्रमांकावर पडणा-या उड्या लक्षात घेऊन आरटीओनेही त्यातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले. हौशी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याअनुषंगाने आरटीओने ०१ व ९९९९  या क्रमांकासह ०७८६, १११, ४४४, ५५५ असे विविध चॉइस नंबर उपलब्ध केले. ०००१ या क्रमांकासाठी तर अडीच ते तीन लाख रुपये आकारणी केली जाते. पाच हजारापासून ते अडीच लाख रुपयांच्या पुढे हे क्रमांक उपलब्ध आहेत. आरटीओने ही नोंदणी ऑनलाइनदेखील केली आहे. एप्रिल ते ३० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत पसंतीच्या वाहनक्रमांकातून आरटीओच्या १२ विभागीय कार्यालयांना ७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. राज्यातील ९९ हजार वाहनधारकांनी पसंतीचे क्रमांक मिळविले. 

६७ हजार वाहनधारक पाच हजारी च्राज्यातील ६७,६५७ वाहनधारकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून पसंतीचे क्रमांक मिळविले. त्यातून आरटीओला २८.५३ कोटी रुपये महसूल मिळविले. १६,९१० वाहनधारकांनी ५ ते ७ हजार रुपये किंमत असलेले पसंती क्रमांक मिळविलेत. ७५०१ ते १० हजार रुपये किंमत असलेले क्रमांक मिळवून १६०२ वाहनधारकांनी आरटीओच्या तिजोरीत १.६० कोटींची भर घातली. १० ते २० हजार किमतीचे क्रमांक ६१३३ वाहनधारकांनी मिळविले. त्यातून आरटीओला ८.८६ कोटी रुपये प्राप्त झालेत. २० ते ५० हजार रुपये प्रत्येकी भरून ६,०३२ वाहनधारकांनी, तर ५० हजार ते एक लाख रुपये किमतीचे क्रमांक मिळवून २६७ जणांनी १.९१ कोटी रुपये खर्च केलेत. ३११ वाहनधारकांनी १ लाख ते अडीच लाख रुपये किमतीचे पसंतीचे क्रमांक मिळविलेत. त्यातून आरटीओला ४.९२ कोटींचा महसूल मिळाला.

विभागनिहाय मिळालेला महसूल (कोटीत) विभाग        प्रकरणे    महसूल बृहन्मुंबई    ६६५२      ६.०८ ठाणे           १०७४४    ९.९८ पनवेल        ३८०१     २.७१ कोल्हापूर    १०६११    ७.३० पुणे            ३०३६६    २३.४५ नाशिक      २७५४५    १९.५९ 

विभाग       प्रकरणे    महसूल धुळे               ८३७    ०.५८ औरंगाबाद    ३५७२    २.८० लातूर            ३१०    ०.३० नांदेड             १२८१    १.०६ अमरावती    १२९७    १.०७ नागपूर        १५६२    १.१३ 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावतीPuneपुणेMumbaiमुंबई