शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओएलएक्सवरून वाहन क्रमांकाची उचलेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

प्रदीप भाकरे अमरावती : ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दुचाकी चोरांच्या चौकशीदरम्यान रोज नवनवीन खुलासे होत आहेत. चोरीच्या दुचाकी ...

प्रदीप भाकरे

अमरावती : ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दुचाकी चोरांच्या चौकशीदरम्यान रोज नवनवीन खुलासे होत आहेत. चोरीच्या दुचाकी बनावट आरसी तयार करून विकल्या जात होत्या. त्यासाठी आरोपी सरफराज मन्सूर अली शाह याने ओएलएक्स या अ‍ॅपवरून वाहन क्रमांकाची उचलेगिरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ओएलएक्स या अ‍ॅपवर जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. जुनी वाहनेदेखील क्रमांक व अन्य माहितीसह तेथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या अ‍ॅपवर विक्रीसाठी असलेल्या दुचाकीचा मूळ क्रमांक घेऊन सरफराज हा बनावट आरसी तयार करायचा. मालकाचे बनावट आधार कार्डदेखील बनवून द्यायचा, ती कागदपत्रे मूळ असल्याची भासवून एजंटद्वारे चोरीची दुचाकीची विल्हेवाट लावली जायची, असा गौप्पस्फोट आरोपींनी कोठडीदरम्यान केला आहे.

शिरजगाव बंड येथील आरोपी सरफराज याचे वडील मुंबईत खासगी काम करतात. तो देखील मुंबईत कॉल सेंटरवर काम करायचा. कोरोनाकाळात तो गावी परतला. कामधंदा नाही, म्हणून इंटरनेटची कामे करायचा. त्यातून गावातीलच नौशाद अली याच्याशी त्याची सलगी झाली. बनावट आरसी व बनावट आधारकार्ड बनवून देण्यापोटी त्याला चांगली रक्कम मिळू लागली. आणि त्याचा गोरखधंदा चांगलाच वाढू लागला. मात्र, सहा महिन्यातच त्याचे बिंग फुटले. प्रत्यक्ष चोरीत सहभागी नसलेला सरफराज गजाआड गेला.

जप्त दुचाकींची संख्या पोहोचली ४७ वर

दोन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून आणखी १८ दुचाकी जप्त करण्यात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना यश आले. त्यामुळे जप्त दुचाकींची संख्या ४७ वर, तर अटक आरोपींची संख्या नऊझाली, तर एक आरोपी पसार आहे.

----------

अशी आहे चोरीची पध्दत

दुचाकीवर येऊन आधी रेकी करायची. चोरीसाठी वाहन निश्चित करायचे, बनावट चावीच्या गुच्छ्यातून चावी लावून पाहायची, लागलीच, तर ती दुचाकी घेऊन पळ काढायचा. ती एजंटपर्यंत पोहोचून द्यायची, अशी या टोेळीची चोरीची पध्दत. तो बनावट चावीचा गुच्छा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

----------

नौशादअली खरा सूत्रधार

चांदुरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, परतवाडा, मोर्शी, शिरखेड व बडनेरासह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपींनी दुचाकी चोरल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार नौशाद अली रहमान शाह (२७, शिरजगाव बंड) हा असल्याची पोलीस तपासात समोर आले आहे. बनावट आरसी बनवून देणारा आरोपी सरफराज मन्सूर अली शाह हा त्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.

-----------

कोट

आतापर्यंत अटक आरोपींच्या कबुलीजबाबानुसार, ४७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. एक आरोपी पसार आहे.

- संजय शिंदे,

तपास अधिकारी,

ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे

--------