शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भांडी धुण्याच्याच जागी धुतला जातो भाजीपालाही

By admin | Updated: September 24, 2016 01:18 IST

रघुवीरमध्ये खाद्यान्न तयार करण्यापूर्वी भाजीपाला आदी वस्तू धुण्याची आणि भांडी धुण्याची जागा एकच

अमरावती : रघुवीरमध्ये खाद्यान्न तयार करण्यापूर्वी भाजीपाला आदी वस्तू धुण्याची आणि भांडी धुण्याची जागा एकच असल्यामुळे खाद्यान्नात गंभीर संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. रघुवीरच्या कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी श्याम चौकातील प्रतिष्ठानावर धाड टाकली. तेथील व्यवस्थेची आणि खाद्यान्न तयार केले जाणाऱ्या जागेची तपासणी केली. त्यांनादेखील रघुवीरचे कामकाज एफडीएच्या नियमावलीप्रमाणे चालत नसल्याचे लक्षात आले. खाद्यान्न निर्मितीसाठी राबणाऱ्या कामगारांची नियमानुसार ठराविक कालावधीत वैद्यकीय तपासणी न होणे, धूर हवेत सोडण्यासाठी चिमणीची उपाययोजना न करणे, खाद्यपदार्थ हाताळताना अत्यावश्यक असलेले हॅन्डग्लोव्हज् न वापरणे, बेसिनजवळच खाद्यान्न निर्मितीसाठचा कच्चा माल ठेवणे, आदी ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या नियमबाह्य बाबींची अन्न औषधी प्रशासनाने नोंद घेतली होती. विश्वासाने लहान मुलांनाही ज्या रघुवीरचा नाश्ता अमरावतीकर खाऊ घालायचे, तो तयार करताना इतकी अस्वच्छता, अनारोग्यता असते, याचे सामान्य ग्राहकांना भानही नसावे. या गंभीर प्रकरणानंतरही एफडीएने कठोर कारवाई अद्याप केलेली नाही. कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आदी नाश्ता तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल , जसे - पालक, सांबार, बटाटे, मिरच्या त्याजागी धुतला जातो, जेथे काही वेळापूर्वीच खरकटी भांडी घासली गेलेली असतात. ग्राहकांनी नाश्ता केल्यानंतरच्या उष्ट्या आणि खरकट्या प्लेट, चमचे तसेच गंज त्याजागी धुतले जातात. त्याजागी असलेल्या अन्नाच्या कणातून जीवघेणे संक्रमण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शुद्ध आणि दर्जेदार नाश्ताचा दावा केला जात असला तरी अशुद्ध आणि अळीयुक्त नाश्ता चढ्या भावात विकणाऱ्या ‘रघुवीर’ला एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांचे अभय का? (प्रतिनिधी) अहवालाची प्रतीक्षा ४एफडीए अधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबर रोजी रघुवीर प्रतिष्ठानात धाड टाकून तेथील खाद्यान्नाच्या कच्चा मालाचे नमुने घेतले. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले असून त्या अहवालावरून पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. अमरावतीकरांना त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एफडीए निगरगट्टच ४रघुवीरची श्याम चौक, राजापेठ व गाडगेनगर रोडवर अशी तीन प्रतिष्ठाने आहेत. सातुर्णा परिसरात मिठाई बनविण्याचा कारखाना आहे. श्याम चौक स्थित प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्यावर एफडीएने सर्वच प्रतिष्ठानांवर छापे मारुन नमुने गोळा करणे व अन्न सुरक्षा मानदांच्या अंमलबजावणीची तपासणी करणे, कर्तव्याचा भाग होता. अजूनही ते पार पाडले गेले नाही.