पान ३
फोटो पी २२ नांदगाव पेठ
नांदगाव पेठ : ‘माझी वसुंधरा’ अभियानात नांदगांव पेठ ग्रामपंचायतची निवड झाल्यानंतर सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. नुकताच येथील मोक्षधाममध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. येथील मोक्षधाममधील हिरवळ पाहून उपस्थितदेखील अचंबित झाले.
कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर, गटविकास अधिकारी बोपटे व राजेंद्र देशमुख, नांदगाव पेठ ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी जितेंद्र देशमुख, सहायक गटविकास अधिकारी पांडुरंग उलेमाले यांची उपस्थिती होती. पेट्रोल पंप ते मोक्षधाम दरम्यान सायकल रॅली व वृक्ष दिंडी काढण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांनी प्रास्ताविकात आजवर केलेल्या विकासकामांची माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामाचा आढावा घेऊन मोक्षधाम येथील सौंदर्यीकरण तसेच हरितक्रांतीचे कौतुक केले.
---------