शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स व लोकमत सखी मंचच्या विविध स्पर्धा

By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे.

जोडी जन्मोजन्माची कसम प्रेमाची : पती-पत्नींसाठी प्रेमाच्या गोष्टी आणि प्रेमाचा पुरस्कारअमरावती : नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे. आतापर्यंत कलर्स व लोकमत सखी मंचच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. याच श्रृंखलेत पुन्हा एकदा पती-पत्नींच्या नातातल्या प्रेमाच्या बंधनांना स्पर्धांमधून सर्वांसमोर आणणारा एक नितांत सुंदर कार्यक्रम म्हणजे -जोडी जन्मोजन्माची कसम प्रेमाची - या अंतर्गत ३ स्पर्धा आणि तीनही स्पर्धांच्या विजेत्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यात पहिली स्पर्धा म्हणजे बेस्ट जोडी (गीत). अतुट गायक जोडी - यामध्ये पती-पत्नी मिळून गाणे सादर करावयाचे आहे. पण गाणे पुनर्जन्मावर आधारित कोणत्याही चित्रपटातील असायला हवे. दुसरी स्पर्धा म्हणजे बेस्ट जोडी (अभिनय). अतूट अभिनय जोडी - यातसुद्धा कोणत्याही पुनर्जन्मावर आधारित कुठल्याही चित्रपटातील डायलॉग किंवा सीन पती-पत्नी मिळून सादर करायचा आहे.तिसरी स्पर्धा - बेस्ट जोडी (कविता). अतूट प्रेम जोडी - यात पुनर्जन्मावर आधारित स्वरचित कविता दोघांनी मिळून सादर करायची आहे.प्रत्येक स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या १० जोड्यांना प्रवेश दिला जाईल. यापेक्षा जास्त असल्यास प्राथमिक फेरीद्वारे अंतिम स्पर्धक निवडले जातील. अतिशय सुंदर विषय या निमित्ताने. पती-पत्नींसाठी हाताळले जाणार असून दोघांना आपल्या प्रेमाची आपल्या नात्याची परीक्षा या स्पर्धांमधून द्यायची आहे आणि पुरस्कार देखील जिंकायचे आहे. या व्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांसाठी बॉलिवूड जोडी ही मनोरंजक स्पर्धा ठेवली आहे. यात सिने जगतातील जोडी बनून यायचे आहे, तसे गेटअप करायचे आहे व वेशभूषा करायची आहे. यात पती-पत्नी असणे आवश्यक नाही. यात दोन सखी किंवा बहीण-भाऊ किंवा पति-पत्नी असे भाग घेऊ शकतात. बेस्ट बॉलिवूड जोडी म्हणून विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.कलर्स चॅनलने नेहमीच अशा सुंदर विषयांवर मालिकांचे प्रसारण करून स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करून तो कायम राखण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहे. याच प्रयत्नात आणखी एक निस्सिम प्रेमावर आधारित कसम नावाची मालिका ७ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. एका मुलीचा आपल्या प्रेमावर इतका प्रचंड विश्वास असतो की, तो मिळविण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या प्रेमाला मिळविण्यात ती यशस्वी होते. कसम ही सिरियल रिषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीवर आधारित असून त्याच्या प्रेमाच्या वाटेत प्रेम विरह आणि प्रेम अशा प्रवासाची सुंदर मांडणी करून प्रेम हेच जगण्याची आणि जगविण्याची खरी ताकत आहे असे सांगितले आहे.अशा प्रेमाच्या कसम या सिरियलसोबत वरील स्पर्धा आणि त्यातील विजेच्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार एकूणच जोडी जन्मोजन्मांची कसम प्रेमाची हा कलर्स व लोकमत सखी मंचचा कार्यक्रम प्रेमाच्या वेगळ्या जगात नेण्याची किमया करेल यात शंका नाही. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लोकमत कार्यालयात येवून नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक. कार्यक्रम दि. ७ मार्च रोजी अभियंता भवन येथे दुपारी ४ वाजता होणार असून अधिक माहितीकरिता ९८५०३०४०८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.