शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथाश्रमात साजरा केला ‘व्हॅलेन्टाईन डे’

By admin | Updated: February 15, 2017 00:15 IST

विदर्भ युथ वेलफेअर सोेसायटीद्वारे संचालित येथील टायटन्स पब्लिक स्कूलतर्फे अनाथाश्रमातील मुलांसोबत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात आला.

टायटन्स पब्लिक स्कूलचा उपक्रम : विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटपबडनेरा : विदर्भ युथ वेलफेअर सोेसायटीद्वारे संचालित येथील टायटन्स पब्लिक स्कूलतर्फे अनाथाश्रमातील मुलांसोबत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव असावी व अभ्यासासोबतच सेवा आणि सेवाभाव विकसित व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाधअयक्ष विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य हेमंत देशमुख, नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख, प्राचार्य श्वेता पैठणकर आदींची उपस्थिती होती.याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी अनाथाश्रमात भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. काही वेळ अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसमवेत घालविण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप तसेच विविध बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. यावेळी सदाशांती बालगृहाचे अध्यक्ष ए.पी.इंगळे, मुख्याध्यापक पवार, सचिव कुमुदिनी इंगळे, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या मंडळींनी अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना कपडे, खाऊ व अन्य वस्तूंचे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले होते. त्यांनी शिस्तीत भेटवस्तू स्वीकारून अनाथाश्रमाची शिकवण मान्यवरांच्या नजरेस आणून दिली. (प्रतिनिधी)