शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद पोलिसाची स्कूल व्हॅनचालकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:12 IST

क्षुल्लक कारणावरून एका स्कूल व्हॅनचालकास दारुड्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे शनिवारी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दारुड्या पोलिसावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

ठळक मुद्देग्रामस्थांचा ठाण्याला घेराव : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : क्षुल्लक कारणावरून एका स्कूल व्हॅनचालकास दारुड्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे शनिवारी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दारुड्या पोलिसावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील आठवडी बाजार चौकात शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मंगरूळ पोलीस ठाण्यातील मद्यधुंद अवस्थेत कर्मचारी राजेश टेकाम ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून शिवीगाळ करीत होता. याचवेळी गावातीलच स्कूल व्हॅनचालक अनिल विष्णू गोहणे (४५) हा आठवडी बाजार चौकातून घरी जात असताना दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कर्मचारी राजेश टेकाम याने अनिलला अडवून प्रथम अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तद्नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. खाली जमिनीवर पडल्यावरसुद्धा पोलीस कर्मचाºयाने त्यांना हाताने धरून तोंडावर थापडा, बुक्क्यांनी मारहाण केली. यात अनिल गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तणावसदृश स्थिती : दंगा नियंत्रण पथकाला पाचारणसदर पोलीस कर्मचारी राजेश टेकाम हा नेहमी दारू पिऊन ग्रामस्थांना शिवीगाळ करतोय. स्कूल व्हॅनचालक अनिल गोहणे याला गंभीर मारहाण केल्याने सदर पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पोलीस ठाण्याला रविवारी दुपारी १२ वाजता घेराव घातला. येथील ठाणेदार विवेकानंद राऊत यांनी ग्रामस्थांना शांत केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटना स्थळी भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढली. गावातील परिस्थिती पाहता दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचा नेहमीच त्राससदर पोलीस कर्मचारी राजेश टेकाम हा परिसरात वादग्रस्त राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वी धामणगाव मंगरूळ रोडवरून चालणाऱ्या स्कूल बसेस अडवून पैसे मागण्याच्या तक्रारीसुद्धा सुद्धा आहेत. तसेच दारू पिऊन आॅटोचालकांना व सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिल्याचेसुद्धा समोर आले आहे.या प्रकरणाची सत्यता पडताळून यात कोण दोषी याची चौकशी करण्यात येईल. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- अविनाश शिंगटे,पोलीस उपविभागीय अधिकारी