शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

वडाळीचा कुख्यात राजासिंग टांक स्थानबद्ध

By admin | Updated: September 24, 2016 01:24 IST

कुख्यात राजासिंग अजाबसिंग टांक (२२, सिखलकरीपुरा, वडाळी) याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात

अमरावती : कुख्यात राजासिंग अजाबसिंग टांक (२२, सिखलकरीपुरा, वडाळी) याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. आरोपी राजासिंग टांक हा २०१३ पासून अवैध दारूविक्री व्यवसायात सक्रिय आहे. त्याच्याविरूद्ध फे्रजरपुरा ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वर्तनामुळे परिसरातील सुव्यवस्था बाधित झाली होती. त्यामुळे राजासिंग टांकवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात यावे, असा प्रस्ताव पीआय प्रमेश आत्राम यांनी पोलीस आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, वाळूतस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्यावर विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ नुसार राजासिंग टांक याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी.पारधी, एएसआय मनोज उसरटे, पोलीस शिपाई राजेंद्र शेंडे, विनय गुप्ता यांनी पार पाडली.