शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वार्डात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया गतिमान झाली आहे. यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, महापालिका ...

अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया गतिमान झाली आहे. यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, महापालिका क्षेत्रातील सहा नव्या केंद्रांसह जिल्हा रुग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक वॉर्डातही नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्या केंद्राची पाहणी केली.

जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग स्कूलमध्ये दोन व आता ज्येष्ठ नागरिक वॉर्डात एक अशी ३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. महापालिकेद्वारा पीडीएमसी व दंतचिकित्सा महाविद्यालयापाठोपाठ आणखी सहा केंद्रे वाढविण्यात आली. त्याशिवाय, शहरातील मुरके हॉस्पिटल, चौधरी रुग्णालय, सुझान कॅन्सर हॉस्पिटल, हायटेक रुग्णालय, मातृछाया रुग्णालय, अच्युत महाराज रुग्णालय या खासगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापौर चेतन गावंडे यांच्‍या उपस्थितीत भाजी बाजारातील केंद्रावर आझाद हिंद मंडळाचे ज्‍येष्‍ठ सदस्य प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे ज्‍येष्‍ठ सदस्य प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ झाला. आयुक्‍त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, माजी स्‍थायी समिती सभापती विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्‍त रवि पवार, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते. बडनेऱ्यातील मोदी हॉस्पिटलमध्ये महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत ज्‍येष्ठ पत्रकार आणि माजी मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन केंद्राचे उद्घाटन झाले.

बॉक्स

महापालिकेची नवी सहा केंद्रे

येथील दसरा मैदानातील आयसोलेशन दवाखाना, बडनेऱ्यातील मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजारातील शहरी आरोग्‍य केंद्र, महेंद्र कॉलनीतील आरोग्‍य केंद्र, दस्तुरनगरातील आरोग्य केंद्र व नागपुरीपेटच्या पालिका शाळेत केंद्रे सुरू करण्‍यात आली आहेत. याशिवाय सोमवारपासून ग्रामीणमध्ये प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.