चष्मा लावला तर लोक आपल्याला वयस्कर म्हणतील, या भ्रमातून अनेक जण मल्टी फोकल लेन्स डोळ्याला लावत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे विना चष्म्याने दूरचे व जवळचे दिसण्यास मदत होते. मात्र, चाळीशीनंतर डोळ्याची कमजोरी सर्वांनाच येत असल्याने हवेतील सूक्ष्म जीवाणी, विषाणूचा संसर्ग होण्याची भीती अधिक असते. डोळे अतिशय नाजूक असल्याने चोळल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता नेत्रतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
बॉक्स
ही घ्या काळजी
चाळीशीनंतर मानसिक ताण वाढल्याने डोळ्याला रक्तपुरवठा करणारी नस ब्लॉक होऊन काचबिंदूची समस्या उदभवते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकाने डोळे (रेटीना) तपासून घ्यावे. चष्मा वापरल्यास धूळ, जंतु संसर्गापासू संरक्षण मिळते. त्यामुळे लेन्सऐवजी चष्म्याचा वापर अधिक सुरक्षित राहत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--
चष्म्याला करा बाय बाय
अलीकडे कमी वयाच्या मुला-मुलींना डोळ्याची समस्या उदभवत असल्याने अगदी लहान वयात जाड्या भिंगाचा चष्मा वापरावा लागत आहे. मात्र, खेळण्या-बागडण्याच्या वयात मुला-मुलींना नाइलाजास्तव चष्मा वापरावे लागत होते. परंतु आता नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोळ्याची सर्जरी करून ही समस्या निवारण्यास मदत झाली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आता चष्म्याला बाय बाय करणे शक्य झाले आहे.
--
काय म्हणतात नेत्रतज्ज्ञ
साठीनंतर डोळ्यात मोतीबिंदू होतोच. याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दूरचे दिसण्याकरिता जाड्या भिंगाचा चष्मा लावावा लागत होता. परंतु आता तंत्रज्ञानाच्या साह्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान नॉर्मल लेन्स टाकल्यास जाड्या भिंगाऐवजी साधा चेष्मा पण नंबरचे काच असलेले लावले जात आहे.
- नम्रता सोनोने, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय
--
डोळ्याची सर्जरी ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झालेली आहे. त्यामुळे ज्यांना चष्म्याचा अडसर ठरत असेल त्यांच्याकरिता हे तंत्रज्ञान फायद्याचे आहे. मात्र, काही काळजी घेणे आवश्यक आहे. लेन्सचे वेगवेगळे प्रकार असून, क्वालिटीनुसार ते कार्य करते. त्यामुळे इजा होण्याची शक्यता फार कमी असते.
- डॉ. सतीश देशमुख, नेत्रतज्ज्ञ