शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू अभियानासाठी समन्वयातून प्रयन्न

By admin | Updated: November 18, 2014 22:48 IST

जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे

अमरावती : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे त्या प्रमाणात जिल्हयात प्रगती झाली नव्हती त्यामुळे आता कोरडवाहू अभियान जिल्हयात अधिक प्रभावीपणे आणी यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन प्रयन्न करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे .कोरडवाहू अभियान जिल्ह्यात माघारल्याचे वास्तव लोकमतने सोमवारी लोकदरबारात मांडले होते. त्यामुळे आता कोरडवाहू अभियनात कृषी विभागाला जो शेतकऱ्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद लोकसहभागाची अट असल्यामुळे मिळत नाही परिणामी अभियानाच्यासाठी कितीही प्रयन्न केले तरी पाहीजे तो प्रतिसाद मिळत नाही यामुळे या अभियानासाठी शासनाकडून ३ कोटींहून अधिक निधी उपलब्ध असतानाही हा निधी खर्च करण्यास अडचणी आहेत .परंतु मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू अभियान यशस्वी करण्याचासाठी कृषी विभाग जोमाने कामाला लागला आहे .यासाठी या अभियानाच्या माध्यमातुन राबविण्यात येणारे जवळपास सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास कार्यक्रम, गटसंघटन, सिंचन प्रक्रियेमध्ये तुषार व ठिबक सिंचन, प्राथमिक कृषी प्रक्रिया यांत्रिकीकरण अशा सर्वच उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन आवश्यक ते उपाय योजना करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे . अमरावती जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानासाठी नऊ तालुक्यांतून १३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उपाययोजना केल्या तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, असे क्षेत्र नेहमीसाठीच कोरडवाहू राहते. या क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजनाअधिक प्रभावी पणे राबवून त्या यस्ववी करण्यात येणार आहे शासनाकडून ज्या गावांची निवड या अभियानासाठी केली आहे, त्या गावांमध्ये दरवर्षी विविध योजनांवर १ कोटी रुपये खर्च केला जातील. (प्रतिनिधी)