शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

उंदराचा दगा, हत्तीवरच भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:35 IST

मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

ठळक मुद्दे२५ जूननंतर मान्सूनचे आगमन : मृगात रखडलेल्या पेरण्या आर्द्रात होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. मृगाच्या उंदराने दगा दिल्याने त्यानंतरचा आर्द्राच्या हत्तीवरच शेतकऱ्यांची मदार आहे.‘वायू’ चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आता सक्रिय झाला आहे. एक - दोन दिवसांत कोकण, मुंबईत दाखल होणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. यंदा केरळमध्येच एक आठवडा उशिरा मान्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रातील ‘वायू’ या चक्रीवादळाने मान्सूनची वाटचाल मंदावली होती. आता या चक्रीवादळाचा जोर पश्चिम किनारपट्टीवरून ओसरल्याने मान्सूनला सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.हवामानतज्ज्ञ व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे सहा. प्रा. अनिल बंड यांच्या महितीनुसार येत्या तीन दिवसांत मान्सून गोवा, मुंबई भागात पोहचू शकतो. हा मान्सून मुंबईला पोहोचला तरी विदर्भात पोहोचेलच याची सध्या तरी खात्री नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाºयामुळे विदर्भात २२ जूननंतर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. २५ जूनपर्यंत मध्य भारतात चांगल्या पावसाची, तर काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, झपाट्याने वातावरणात बदल होत असल्याने मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा मंदावली असल्याने बंगालच्या उपसागरातील शाखेने जोर धरला आहे. त्यामुळे विदर्भात बहुधा आंध्रप्रदेशच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याचे बंड यांनी सांगितले.१९ दिवसांत ८६ मिमी पावसाची तूटजिल्ह्यात १ ते १९ जून या १९ दिवसांत ९२.५ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ८.८ मिमी पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. गतवर्षी याच दिवसांत ६०.०८ मिमी नोंद झाली होती. हा पाऊस पूर्वमौसमी होता. दोन दशकात यंदा प्रथमच प्री-मान्सूनचा पाऊस नाही. त्यामुळे यंदा धूळवाफ पेरण्या झाल्याच नाहीत. आणखी उशीर झाल्यास ६० दिवसांच्या अवधीतील मूग, उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे.पेरणीपूर्व मशागतीला सुरूवातरोहिणीत होणाºया पूर्वमौसमी पावसानंतर जिल्ह्यात साधारणपणे खरीपपूर्व मशागतीला वेग येतो. यंदा पूर्वमौसमी पाऊस झालाच नाही. रोहिणीसंग मृगही कोरडा गेला. त्यामुळे शेत मशागतीची कामे रखडली होती. मात्र, पुढच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार, या वार्तेनेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बियाणे बाजार सद्यस्थितीत थंडावलेला आहे. पावसाच्या आगमनानंतर येथील वर्दळ वाढणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी