शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अप्परवर्धा धरण भरले ९३ टक्के भरले, दोन दरवाजे उघडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

मोर्शी (अमरावती) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाणारे अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा मंगळवारी ९३ टक्के जलसाठा ...

मोर्शी (अमरावती) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाणारे अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा मंगळवारी ९३ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख व कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यानंतर धरणाची दोन दारे दुपारी ४ वाजता पाच सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून १६ दलघमी प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठी येत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्या पूर्णतः ओसांडून वाहत आहेत. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेश येथील जाम नदी, पाक नदी, सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी तसेच दमयंती, नळा नदीलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अप्पर वर्धा धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी धरण ९३ टक्के भरले. त्यामुळे आता पर्यटकांना उत्सुकता लागलेले हे नयनरम्य दृश्य बघण्याचा योग प्राप्त झाला आहे.

मोर्शी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी असून सध्या अप्पर वर्धा धरणाची पातळी ३४२.३ मीटर झाली आहे. या धरणामधून अमरावती, मोर्शी यासारख्या मोठ्या शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते. सिंचनाकरिता कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. याच धरणातील पाण्यावर मोर्शी तालुक्यासह वरूड, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असते.

सप्टेंबर महिन्यात अप्पर वर्धा धरण क्षेत्रात चांगला पाऊस कोसळल्याने धरण निर्धारित पातळी गाठून १३ दारे उघडली जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे. उपविभागीय अभियंता रमण लायचा, गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी पर्यचकांना आवरण्यासाठी सज्ज आहेत. दारे उघडण्यात येत असल्याचे वृत्त कळताच जिल्ह्यातील पर्यटक पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी धरण परिसरात गर्दी करीत आहेत.