शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

फोटो पी २३ अंजनगाव बारी पान ३ ची िलड अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी ...

फोटो पी २३ अंजनगाव बारी

पान ३ ची िलड

अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख रब्बी पिके जमिनीवर झोपल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तसेच पालेभाज्या अवकाळी पावसामुळे सडल्या. वादळामुळे संत्रा, मोसंबी, निंबू इ. झाडे कोसळून पडली आहेत.

अंजनगाव बारी परिसरात गारपीट झाल्याने कांदा, गहू ही पिके जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आहे. या वर्षी ६० टक्के गहू शेतकऱ्यांच्या घरी आला. मात्र, ४० टक्के गहू अद्यापही शेतात पडून आहे. पावसाचे पाणी शिरून गव्हाच्या पेंड्या सडत आहे. पपई, आंबा हे पिके वादळाने झाडासह कोसळून पडले आहे. शेतकरी उत्पन्न वाढविण्यासाठी फळपिकांकडे वळले असताना आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, निंबू, डाळिंब ही फळे मातीमोल झाल्याने मुद्दल निघेल, याचीही शाश्वती नाही. परिसरात १० ते १५ गावांतील पार्डी(देवी), अडगांव बु., मांजरी म्हसला, उतखेड, टिमटाळा, मालखेड (रेल्वे), आमला (विश्वेश्वर), मांजरखेड (कसबा), बासलापूर येथेही वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

३०० विटभट्ट्यांचे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात ३०० विटभट्ट्या कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदारांचा एक ते दिड लाख एवढा माल निरुपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मजुरांची घरावरील टिनाची छपरे उडाल्याने संपूर्ण मजूर गावात निघून गेल्याने कारखाने ओसाड पडले आहे.

बॉक्स

पोर्टलवर नोंदवा माहिती

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव व शेत सर्वे नंबर गावातील तलाठी किंवा कृषी सहायक यांच्या कडे द्यावे, असे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ही माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.