शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांच्या कामात गैरप्रकार

By admin | Updated: August 18, 2015 00:29 IST

लहान पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.

कामे न करताच काढली ५० लाखांची देयकेराजेश मालवीय धारणीलहान पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. कामे न करता ५० लाखांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांची दुरुस्ती बांधकामे, आदी कामांची विशेष दुरुस्ती न करता किरकोळ थातूर-मातूर कामे करुन मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी घेऊन संबंधित मजूर संस्था कंत्राटदार, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी संगनमताने दुरुस्तीच्या नावावर ५० लाखांची देयके काढल्याचे उजेडात आले आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावती अंतर्गत येथील लहान पाटबंधारे विभागाच्या सिंचन तलाव दुरुस्तीसाठी २०११ मध्ये शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये मांडवा लघुसिंचन तलाव मुख्य कालव्याचे सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणासह दुरुस्तीचे काम न करताच १२ लाखांचे देयके काढले. मोगर्दा, साद्राबाडी, बेरदा सिंचनातील मुख्य कालवा दुरुस्तीची कामे करुन १३ लाखांचे देयके काढले. हिराबंबई लघु पाटबंधारे योजना प्रकल्पांचा मुख्य कालव्याचे मातीकाम व बांधकाम न करता १५ लाख रुपये काढण्यात आले. भवर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची भिंत संरक्षण भिंतीचेही १३ लक्ष रुपये काढले. महत्त्वाच्या गडगा मध्यम प्रकल्पाच्या कामातही गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. शासन व पाटबंधारे खात्याची दिशाभूल केल्याप्रकरणी दक्षता पथकाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.दुरुस्ती कामांची सखोल मोजमाप पुस्तिकेसह चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांविरुध्द नियमानुसार कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल.- एल.पी. इंगळे, कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती.