शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतूक ठरली तरूणीचा काळ

By admin | Updated: December 3, 2015 00:17 IST

येथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला.

दर्यापूर पोलिसांचे दुर्लक्ष : चौकात अवैध वाहतूक फोफावली, कृष्णालीचा हृदयद्रावक मृत्यू संदीप मानकर दर्यापूरयेथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला. तरूणीच्या अकाली मृत्यूसाठी बेशिस्त वाहतूकच जबाबदार असल्याची भावना दर्यापूरकर नागरिकांनी व्यक्त केली आहे. कृष्णाली विनायकराव घाटे (२२ रा. सहकारनगर) या तरुणीचा एकता हॉस्पीटलसमोर दुर्देवी मृत्यू झाला. परंतु एकता हॉस्पीटल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. उजवीकडून नियमबाह्य पध्दतीने छोटी आॅटोरिक्षा आल्याने समोरुन येणाऱ्या कटलाधारकाची अडचण झाली. दरम्यान दुचाकीधारक तरूणीने कटल्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता एका डॉक्टरचेही वाहन आले. दोघांनाही मागून येणारा ४०७ ट्रक न दिसल्याने दुचाकीस्वार मुलगी उजव्या बाजूला पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकात येवून चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात डॉक्टर व मृत युवतीची बहिण जखमी झाली. या अपघातानंतर अख्खे दर्यापूर शहर खडबडून जागे झाले आहे. दर्यापूर शहरात भरधाव वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील मुख्य चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्यांना पायी चालताना सुध्दा तारेवरची कसरत करावी लागते. परंतु नो-पार्किंग झोनमध्ये वाहने लावणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात येत नाही. येथील बसस्थानक चौकात तीन हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या समोर मुख्य रस्त्यावर नागरिक रस्त्याच्या कडेपर्यंत वाहने उभी करतात. येथील मुख्य चौकात फळविक्रेत्यांनी भर रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सहा महिन्यांपूर्वी एका चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही गाडी दुकानात शिरली होती. एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बससुध्दा हॉटेलमध्ये शिरल्याची घटना ताजीच आहे. येथील रेल्वे फाटकाजवळ अतिक्रमित जागेत अनेकांनी दुकाने थाटली आहेत. आॅटोरिक्षाच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या एका मॅकेनिकने तर रस्त्याच्या मधोमध आॅटोरिक्षा उभी करण्याचा सपाटा लावला आहे. कारवाई होेत नसल्याने त्याची हिंमत बरीच वाढली आहे. रेल्वे फाटक, सांगळूदकर कॉम्प्लेक्स तसेच आकोट नाका रस्त्यावर कुठेही काळी-पिवळी मॅजिकव्हॅन व ईतर वाहने बेशिस्तरित्या उभी असतात व नियमांचे उल्लंघन करतात. परंतु पोलीस त्यांच्यावर थातुरमातूर कारवाई करुन सोडून देतात. दोन वर्षांपूर्वी बसस्थानक चौकात शिरलेल्या आॅटोरिक्षा व अन्य वाहने पोलिसांनी बाहेर काढून त्यांना अमरावती, मूर्तीजापूर रस्त्यावर अधिकृत जागा दिली होती. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. परंतु आता पुन्हा त्यांनी बसस्थानक चौकासमोर त्यांचा ठिय्या केला आहे. अवैध रेतीतस्करही शहरातून बेशिस्त वाहतूक करतात. यानंतरे मोठे अपघात टाळायचे असतील तर बेशिस्त वाहतुकीला लगाम लावणे पोलिसांचे कर्तव्य महत्वाचे राहाणार आहे. अशा वाहनचालकाविरुध्द कारवाई करणे गरजेचे आहे.