शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

तारेकर बिल्डिंगसमोरून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

------------------ त्रिसूत्रीचे उल्लंघन, गुन्हा दाखल अमरावती : आदित्य बारसमोरून गस्त घालताना विनामास्क फिरताना आढळला. विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर ...

------------------

त्रिसूत्रीचे उल्लंघन, गुन्हा दाखल

अमरावती : आदित्य बारसमोरून गस्त घालताना विनामास्क फिरताना आढळला. विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर दिल्यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------

क्षुल्लक कारणावरून हातावर ब्लेड मारले

तळेगाव दशासर : उकिरड्यावर कचरा टाकल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद करीत हातावर ब्लेडने मारून जखमी केल्याची घटना तिवरा येथे ११ जुलै रोजी घडली. आकाश बबन गिरी यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी शुभम दिलीप भागवत, विष्णू भागवत, गजानन विष्णू भागवत, राजू विष्ण भागवतविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने दिली हाक

धामणगाव रेल्वे : अल्पवयीन मुलगी टिकल्या आणण्यास दुकानात गेली असता सख्याहरीने तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने आवाज दिल्याची घटना उघड झाली. तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी प्रकाश सुभाष शेंडे (२२, रा. भोईपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण

मंगरूळ दस्तगीर : मेहूण्याने कामानिमित्त दुचाकी दिली नसल्याने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. पतीने काठीने मारहाण्याच्या तक्रारीवरून मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी विजय शेषराव लोखंडे (४२, झाडगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

बकऱ्या चारताना महिलेचा विनयभंग

धारणी : पाहूणी आलेल्या महिलेने मावशीच्या बकऱ्या चराईसाठी नेल्या असता, अन्य एकाने महिलेचा हात पकडून गालाला चावा घेतला. पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकीही दिल्याची घटना ११ जुलै रोजी धारणी तालुक्यात घडली. तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वर परसराम कासदेकर (३२, रा. भोकरबर्डी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

कपाटातून ९० हजारांचे ऐवज लंपास

धारणी : घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या मुलीच्या घरात शिरून कपाटातील ८० हजार रुपये रोख व ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी असा ९० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ जुलै रोजी उघड झाली. तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

घरासमोर दारू पिऊन शिवीगाळ

चांदूर रेल्वे : घरासमोरू दारून पिऊन शिवीगाळ करणाऱ्या युवकाला हटकले असता, काठीने मारल्याची घटना ११ जुलै रोजी सोनोरा भिलटेक येथे घडली. आशिष उत्तमराव गोरे (४०) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी बंटी ऊर्फ वैभव नरेंद्र काळबांडे (२८, रा. सोनोरा भिलटेक) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

भिंत पाडून सेटअप बॉक्स चोरून नेले

अंजनगाव सुर्जी : बंद घराची भिंत पाडून आत घुसला व सेटअप बॉक्स चोरून नेल्याची घटना १२ जुलै रोजी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल प्रभाकर जवंजाळ (रा. वानखडेपेठ) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

क्षुल्लक कारणावरून वीट मारली

पथ्रोट : घरासमोर उभा असलेल्या युवकाला हटकल्यावरून झालेल्या वादात विटेने मारून जखमी केल्याची घटना भिलोना येथे १२ जुलै रोजी घडली. विनोद आनंदराव छापानी यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी देवानंद बंडुजी डोंगरदिवे, नितेश डोंगरदिवे, दिवाकर डोंगरदिवे (सर्व रा. भिलोना)विरुद्ध गुन्हा नोंदविला, देवानंद यांच्या तक्रारीवरून विनोद आनंदराव छापानेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

--------------------

-