शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आष्टगाव ते वरला दरम्यान दुचाकी धडकल्या, युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

तीन गंभीर जखमी, जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले, चौघेही चांदूर बाजार तालुक्यातील मोर्शी (अमरावती) : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर ...

तीन गंभीर जखमी, जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले, चौघेही चांदूर बाजार तालुक्यातील

मोर्शी (अमरावती) : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर आष्टगाव ते वरला दरम्यान दोन दुचाकींच्या धडकेत युवक ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनुसार, चांदूर बाजार तालुक्यातील खैरी दोनोडा, येलकीपूर्णा, हिरूळपूर्णा व कुरळपूर्णा येथील चार युवक एमएच २७ एवाय ५८६१ व एमएच २७ सीएफ ६९८१ या क्रमांकाच्या दुचाकींनी मोर्शीला काही कामानिमित्त येत होते. परंतु, अष्टगाव ते वरला या गावादरम्यान त्यांच्या दुचाकींची आपसात धडक होऊन नितीन नामदेवराव नांदणे (२३, रा. कुरळपूर्णा) हा जागीच गतप्राण झाला. अविनाश भानगे (२४, रा. खैरी दानोडा), ऋषीकेश पवार (२३, रा. येलकीपूर्णा) व रोशन नान्हे (२७, रा. हिरूळपूर्णा) हे गंभीररीत्या जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच ठाणेदार मोहंडुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. उपजिल्हा रुग्णालयातील तुषार पोहकर यांची खासगी ॲम्बुलन्सद्वारे मृतासह जखमी युवकांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणले. मृत नितीनचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहेत.