अमरावती : भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी चालवून एका अन्य दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक इसम ठार झाल्याची घटना नांदगावपेठ ठाणे हद्दीतील सावर्डी रिंग रोड येथे गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात आणखीन दोन जण जखमी झाले.
मोहम्मद शाबीर (रा. आशियाना कॉलनी अमरावती) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीच्या एमएच ३७ सीआर ९४३३च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणी मृताचे लहान भाऊ फिर्यादी अब्दुल कदीर शेख शब्बीर (३०, रा.आशियाना कॉलनी) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यांची मोठ भाऊ मृतक हे त्यांच्या एमएच ३० झेड ८५९१ या दुचाकीने सावर्डी एमआयडीसीकडून रिंगरोड साइडने अमरावतीला येत असताना, सावर्डीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरोपीच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. सदर इसमाच्या डोक्याला व तोंडाला जबर इजा झाल्याने लोकांच्या मदतीने त्यांना इर्विन रुग्णालयात आणले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यामध्ये आरोपीही जखमी झाला आहे. मृताच्या मागे बसलेला अमीक खान हाही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविची कलम २७९,३३७,३०४(अ) अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत.