शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनीला दोन लाख शेतकऱ्यांनी दिल्या भेटी

By admin | Updated: April 14, 2016 00:09 IST

स्थानिक सायन्सकोर मैदानात कृषी विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनीला

जनजागृती : प्रबोधन, तंत्रज्ञानातून विकासाचे पाऊलअमरावती : स्थानिक सायन्सकोर मैदानात कृषी विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनीला सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रबोधन व तंत्रज्ञानातून विकासाकडे वाटचाल करणाबाबतच्या टिप्स घेतल्या आहेत. या प्रदर्शनीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.१० एप्रिलपासून सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनीला शेतकरी तसेच जिल्हा भरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रदर्शनीतील विविध उपक्रम, स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच तंत्रज्ञानाचा लाभ देखील घेतला. याप्रदर्शनीत १०० स्टॉल खासगी कंपन्यांनी लावून विविध शेतीपयोगी साहित्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. ९० बचत गटांचे स्टॉल, पाणंद रस्ते व जलयुक्त शिवाराची माहिती देणारे स्टॉल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले. अत्याधुनिक मशिनीद्वारे शेतीचे उत्पादन कसे वाढविता येईल, यासंबंधीत स्टॉलला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. धान्य महोत्सवात उत्कृष्ट धान्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक नागरिकांनी या धान्याची खरेदी सुध्दा केली. कांदा, हळद व अन्य साहित्याच्या स्टॉलवरही शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विविध फळांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. विविध वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधींच्या स्टॉलवर नागरिकांची एकच गर्दी होती. कृषी पंप, शेतीपयोगी मशीन, ट्रॅक्टर विक्री, बी-बियाणे, फूड झोन आदींचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.सौर ऊर्जेवरील उपकरणे शेतकऱ्यांसाठी लाभदायककृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध कंपन्यांनी सौर ऊर्जेवरील उपकरणांचे स्टॉल लावले होते. सौरऊर्जा उपकरणांचा उपयोग करून शेतीचा विकास कसा करता येऊ शकतो, याबद्दल महाऊर्जा अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे, यू.एम.पांडे, एन.टी.बागल, आर.एम.गरड व वैद्य यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आधुनिक तंज्ञत्रानातून साकारलेली सोलरपंप प्रणाली शेतीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी होती. यामध्ये शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सोलर पंप उपलब्ध होते. याबाबत हर्षल खोडस्कर, प्रमोद जवंजाळ व राहुल बिजवे आदींनी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोलरवरील स्ट्रीट लाईट, पाणी गरम करणारे उपकरण आदी साहित्य प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.