शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन घटनांत चार दुचाकींसह दोन आरोपींना अटक

By admin | Updated: December 4, 2015 00:27 IST

शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेतील दोन आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले.

कारवाई : शहरात नाकाबंदी, दुचाकी जप्तपरतवाडा : शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेतील दोन आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले. बुधवारी सायंकाळी ही कारवाही करण्यात आली.शे. समीर शे. सलीम (३०, रा. ठाकुर कॉलनी, परतवाडा) व शे. अबरार शे. इस्माईल (३२, रा. खरपी) असे दुचाकीसह अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. देवेंद्र दुर्गाप्रसाद तिवारी (३५, रा. संतोषनगर, परतवाडा) यांच्या मालकीची दुचाकी २५ नोव्हेंबर रोजी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. यावर परतवाडा पोलिसांनी शे. समीर शे. सलीम (रा. ठाकूर कॉलनी) याला ताब्यात घेतले असता एमएच २७ व्ही. ६४९६ ही दुचाकी त्याचेकडून जप्त करून त्याला अटक करण्यात आली.परतवाड्यात दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने ठाणेदार किरण वानखडे यांनी बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली होती. त्यादरम्यान खरपी येथील शे. अबरार शे. इस्माईल चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची टीप मिळाली. बैतूल स्टॉप येथे नाकाबंदीदरम्यान अबरार दुचाकी एमएच २७ झेड २३५९ चालविताना आढळून आला. कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्याला तपासात घेतले असता त्याने हिरो होंडा कंपनीच्या अधिक दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.