शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातील दोन तास अभ्यागतांसाठी

By admin | Updated: June 30, 2016 00:21 IST

आठवड्यातील किमान दोन तास पुनर्वनियोजित भेटी व्यतिरिक्त येणाऱ्या अभ्यागतांना देण्यात यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

आयुक्तांना निर्देश : एक पाऊल प्रतिमासंवर्धनाकडेअमरावती : आठवड्यातील किमान दोन तास पुनर्वनियोजित भेटी व्यतिरिक्त येणाऱ्या अभ्यागतांना देण्यात यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यगतांसाठी वेळ निश्चित करावी, असे शासनाला अपेक्षित आहे. शहर व्यवस्थापनाच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून शहरातील नागरिक त्यांच्या समस्या, अडचणी निदर्शनास आणून देण्याकरिता महापालिका आयुक्तांना भेटू इच्छितात. तथापि त्यांना आयुक्तांची भेट मिळत नाही.अथवा त्यासाठी त्यांना वारंवार आयुक्त कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे संबंधित नागरिक शासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचे निरीक्षण शासनाने नोंदविले आहे. पारदर्शक व जबाबदार प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही. तसेच नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, महापालिकास्तरावर जबाबदारी पार पाडणे शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे जनमानसात महापालिकेची, पर्यायाने शासनाची प्रतिमा तयार होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी भेटावयास येणाऱ्या नागरिकांच्या समस्येची दखल घेणे, त्यांच्यासाठी निश्चित वेळ राखून ठेवून त्यांना भेट देणे व शक्यतोवर त्यांच्या समस्यांचे निराकरण महापालिका स्तरावर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्तांना भेट सोमवारी, गुरुवारी सोमवारी व गुरुवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पूर्व परवानगीशिवाय अमरावतीच्या महापालिका आयुक्तांना भेटता येणार आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी त्यांच्या दालनासमोर नागरिकांसाठी सूचना फलक लावले आहेत. निवेदन सादर करताना पाच व्यक्तीशिवाय अधिक व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही व छायाचित्र व चित्रीकरणाचा आग्रह करु नये, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रभावी उपाययोजनांचे निर्देश भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांची दखल घेवून त्यांची भेट घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्य शासनाने व्यक्त केले आहे. या अनुशंगाने महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या गाऱ्हाणे निराकरणाबाबत प्रभावी उपाययोजना करावी व आठवड्यातील किमान दोन तास पूर्व नियोजित भेटी व्यतिक्ति येणाऱ्या अभ्यागतांसाठी ठेवण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.