शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जुळ्या शहरात अनेक टोळ्या सक्रिय

By admin | Updated: August 29, 2015 00:37 IST

रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे.

टोळ्यांचे कंबरडे मोडा : पोलिसांनी खुफिया विभाग 'स्ट्राँग' करण्याची मागणीअमरावती/अचलपूर : रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे. अशा अनेक लहान-मोठ्या टोळ्या अजूनही अचलपूर-परतवाड्यात कार्यरत आहेत. त्यांची संघटित दबंगगिरीने सामान्य माणूस त्रस्त आहे. या टोळ्यांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्या मुसक्या बांधाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जुळ्या शहरात संघटित गुन्हेगारी डोके वर काढत आहे. पोलिसांच्या खुफिया विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष असते तर कदाचित अमित बटाउवालेचा जीव वाचू शकला असता. येथे अनेक लहान मोठ्या टोळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या नावाने प्रसिध्द आहेत. काहींना नावे नसून एक-दोन युवकांच्या प्रभावाखाली त्या एकत्र येतात. कुठे कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, कुस्ती, आखाडा आदी विविध खेळांच्या नावाने तर कुठे एखाद्या धर्म किंवा जातीचा संवेदनशील आधार देऊन तर कुठे एखादा अवैध व्यवसाय करुन पैसे कमावण्याच्या उद्देशाने या काही युवक एकत्र येऊन या टोळ्या तयार झाल्या असून त्यांची दबंगगिरी सुरु असते. ह्यांच्या कारस्थानाचा त्रास एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्याला मारझोड करुन उलट त्याच्याचविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची, असे यांचे गुन्हेगारी जगतातील फंडे असतात. या टोळ्यांविरुध्द एखाद्याने थोडासाही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज विविध मार्गाने पध्दतशीरपणे दाबण्याचा प्रयत्न होतो. आपआपल्या पक्षांचे बळ वाढावे आपले स्थान पक्षात मजबूत रहावे, आपल्या विरोधकांना गप्प करावे यासाठी विविध पक्षाचे नेते ह्या टोळ्यांना राजाश्रय देतात. त्यात काही लोकप्रतिनिधीसुध्दा आहेत.या टोळ्यांमधील काही जण जिममध्ये जाऊन पिळदार शरीर तयार करतात मुद्दाम आपल्या दंडाचे प्रदर्शन करुन समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण कानात बाली घालतात तर कुणी दाढी आणि केस वाढवतो. एखादा गळ्यात विशिष्ट रंगाचा दुपट्टा खांद्यावर टाकून मिरवत असतो. लोकांमध्ये दहशत निर्माण करुन आपले अवैध व्यवसाय सुरळीत सुरु रहावे हा या टोळ्यांचा उद्देश असतो यात शंका नाही.या टोळ्या सुरुवातीला लहान असतात आपल्या दबंगगिरीवर या मोठ्या होतात तसे यांचे कारनामे वाढत जातात. मग समाजाला घातक ठरतात. या टोळ्यांना पोलिसांचीही छुपी मदत असते, हे बारुद गँगच्या प्रकरणातून उघड झाले आहे. अशा अनेक टोळ्या अचलपूर, परतवाडा शहरासह देवमाळी, कांडली, असदपूर, पथ्रोट, आसेगाव यासह आदी गावांत कार्यरत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांना जात धर्म नसतो. त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा असतो. शहरात दादागिरी करणाऱ्या टोळ्यांविरुध्द चांगल्या लोकांनी एकत्र येऊन त्यासाठी मोठे संघठन उभे करणे गरजेचे झाले आहे. अशा टोळ्यांमधील दोन-चार जणांना जरी शिक्षा झाली की सर्वजण वठणीवर येतात. त्यासाठी सज्जनांनीच आता समोर आले पाहीजे.-सचिन देशमुख,माजी नगराध्यक्षजुळ्या शहरात अशा लहान टोळी सुरुवातीला उदयाला येते. तीची त्याच वेळी पोलीसांनी माहिती घेऊन बंदोबस्त केला तर ती मोठी होत नाही. त्यासाठी पोलीसांना खुफिया विभाग स्ट्रॉंग करुन त्याची माहिती ठेवावी लागले. पण दुर्दैवाने अशाटोळ्यांना पोलीसांचीच छूपी मदत असते. काही लोकप्रतिनिधींच्या छत्रछायेतही काही गँग आहेत. -किशोर मोहोड , अध्यक्ष युवक आर.पी.आयटोळ्यांचे निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर समाजधूरीणांनी समोर आले पाहीजे. रक्तदान, निर्माल्य, निर्मूलन, झाडे लावा झाडे जगवा आदी चांगली कामे काही युवक करत आहे.वाईट गोष्टींचाच उदोउदो जास्त होतो. प्रत्येक युवकात महात्मा गांधीचे विचार रुजविनेही गरजेचे आहे. सामान्यांना जुळ्या शहरात टोळ्यांचा त्रास नाही. रवीन्द्र तोंडगावकर,नागरिक